Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे क्रीडा विभागाचे आवाहन

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे क्रीडा विभागाचे आवाहन



सांगली : सांगली दर्पण 

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याची मुदत दि. 16 ते 30 जानेवारी 2023 असून इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांनी विहीत मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन क्रीडा विभागामार्फत करण्यात आले आहे. 

क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासन शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार / जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करते. 

शासनाने नुकत्याच दि. 14 डिसेंबर 2022 च्या शासन निर्णयान्वये शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी नियमावली विहीत केली आहे. या नियमावलीनुसार सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या तीन स्वतंत्र वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील जेष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांच्यामार्फत अर्ज मागविले आहेत. 

अर्जाचे नमुने https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून व्यवस्थितरित्या भरून संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन क्रीडा विभागामार्फत करण्यात आले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.