Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली ९ दिव्यांग बोगस प्रमाणपत्रांचा पर्दाफाश...

सांगली ९ दिव्यांग बोगस प्रमाणपत्रांचा पर्दाफाश...


सांगली :  दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून मोठा लाभ पदरात पाडून घेण्याचा डाव वसंतदादा शासकीय रुग्णालयात अधीष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी हाणून पाडला. यावेळी ९ बोगस प्रमाणपत्रांचा पर्दाफाश करण्यात आला. यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात विविध ठिकाणी काम करत असणाऱ्या कामगारांची कामगार आयुक्तांकडे नोंदणी होत असते. जर एखादा कामगार काम करत असताना जखमी झाला आणि तो ७५ टक्केपेक्षा जास्त दिव्यांग असेल तर त्याला शासनाकडून दोन लाखाची भरपाई मिळते. तसेच सरकारकडून ७५ टक्केपेक्षा जास्त दिव्यांग असणाऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयेही दिले जातात. याचा गैरफायदा मिळवून देण्यासाठी अनेक एजंट तयार झाले आहेत. त्यातीलच ९ बोगस लाभार्थी उघडकीस आले.

कामगार मंत्रालयाकडून दर महिन्याला पात्र लाभार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी शासकीय रुग्णालयाकडून होत असते. गेल्या महिन्यात पडताळणीसाठी आलेल्या प्रमाणपत्रापैकी ९ प्रमाणपत्रे बोगस असल्याचे आढळून आले. या ९ लोकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी अधीष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी पोलिस स्टेशनकडे तक्रार दिली आहे. नणंदकर म्हणाले, जिल्ह्यातील अनेक दिव्यांगांना ५ टक्केपासून ९० टक्केपर्यंत प्रमाणपत्र देण्यात येते. आजपर्यंत अनेक दिव्यांगांना प्रमाणपत्र दिले आहेत. दिव्यांगांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. याचा गैरफायदा घेण्यासाठी मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. ९ प्रमाणपत्रे बोगस आढळली आहेत. यापुढे आमच्याकडे पडताळणीसाठी येणाऱ्या प्रत्येक प्रमाणपत्राची काटेकोरपणे चौकशी केली जाईल.

याबाबत प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामदास कोळी म्हणाले, या बोगस प्रमाणपत्रांमुळे खऱ्या लाभार्थ्यांवर अन्याय होत आहे. यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. याबाबत आम्ही कामगार मंत्री तसेच पालक मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे तक्रार केली आहे, परंतु अजून आम्हाला न्याय मिळाला नाही.

पडताळणी करूनच प्रमाणपत्र वाटप : अधीष्ठाता

वसंतदादा शासकीय दवाखान्याचे अधीष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर म्हणाले, दिव्यांग प्रमाणपत्र शासकीय दवाखान्यात दिले जाते. परंतु हे देत असताना आम्ही सर्वती पडताळणी करूनच देत असतो. या प्रमाणपत्रावर प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळा कोड असतो. तसेच क्युआर कोडही असतो. ज्या ९ लोकांची बोगस प्रमाणपत्रे आढळली आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी आम्ही तक्रार दिली आहे..


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.