जीवन कसे जगावे हे पुस्तके शिकवतात - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
- सांगली ग्रंथोत्सव 2022 चे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते उद्घाटन
सांगली, दि. 28, : जीवन कसे असावे हे पुस्तके शिकवतात. पुस्तिकाची, वाचनाची आवड धरल्यास यश निश्चित मिळते. आजच्या काळात वाचनाचे प्रमाण थोडे कमी झाल्याचे दिसते ग्रंथोत्सवात अनेक लेखक, विचारवंतांचे साहित्य वाचकांसाठी उपलब्ध झाले आहे. वाचेल तो वाचेल असे म्हटले जाते. संकटे, चिंता प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात. आशावेळी अनेकजन हतबल होतात. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, स्वामी विवेकानंद यांना समोर ठेवावे, दु:खला सामोरे जाण्याची क्षमता आपल्या येईल. असे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी लोकप्रतिनिधी होऊ शकलो ते जन्माला आले नसते तर आज मी येथे नसतो. घटनेनं दिलेल्या अधिकारामुळेच सामान्यातला सामान्य, गरिबातील गरिब माणूस सरपंचापासून राष्ट्रपती पदापर्यंत पोहचू शकतो. ही ताकद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची आहे. असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने दि. 28 जानेवारी 2023 व रविवार, दि. 29 जानेवारी 2023 या कालावधीत शांतिनिकेतन लोकविद्यापीठ, वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना समोर, माधवनगर रोड, सांगली येथे ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथोत्सवाचे उद्घाटन कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते संपन्न झाले यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यक प्रा. वैजनाथ महाजन, शांतीनिकेतनचे संचालक गौतम पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आ. मु. गलांडे, प्रशांत खाडे, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे एकनाथराव जाधव, पांडूरंग सुर्यवंशी, विष्णू तुळपुळे, संतोष शिंदे , यांची प्रमुख उपस्थिती होती. सकाळी या ग्रंथदिंडी सोहळ्याचा शुभारंभ महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांच्याहस्ते ग्रंथपूजनाने झाली.
ग्रंथ आपल्या दारी हा उपक्रम स्तुत्य असून पुस्तक हा आपला साथी बनवा, एकाकीपण कधीच येणार नाही. वृध्दपकाळही सुखाचा होईल. वाचन आणि संगिताची आवड तुम्हाला जीवनभर आनंदी ठेवेल. जीवन कसे असावे हे पुस्तके शिकवतात. पुस्तिकाची, वाचनाची आवड धरल्यास यश निश्चित मिळते असे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी कामगार कल्याण विभागाच्यावतीने मिरज येथे घेण्यात येणाऱ्या साहित्य संमेलनाचाही लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी ग्रंथोत्सवासाठी शांतिनिकेतन या संस्थेने केलेल्या सहकार्याचेही कौतुक केले. सुत्रसंचलन विठ्ठल मोहिते यांनी केले तर स्वागत गित कन्या विद्यालयाच्या मुलींची गायीले ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रविवार, दि. 29 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता शांतिनिकेतन लोकविद्यापीठ सभागृहात ग्रंथालय सेवा व ई-ग्रंथालय याविषयावर जेष्ठ ग्रंथपाल डॉ. एस. ए. एन. इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली “परिसंवाद” होणार असून या परिसंवादामध्ये प्रा. डॉ. सौ. अपर्णा कुलकर्णी, प्रा. डॉ. अमित सत्तीकर व विजय बक्षी आदींचा सहभाग राहणार आहे. दुपारी 2.30 वाजता शांतिनिकेतन लोकविद्यापीठ सभागृहात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व ग्रंथोत्सव कार्यक्रमागील उद्देश याविषयावर महानगरपालिका उपायुक्त राहुल रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली “परिसंवाद” होणार असून या परिसंवादामध्ये आय.आर.एस. अजिंक्य काटकर, पोलिस उपधिक्षक अजित टिके, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल व परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी अजय शिंदे आदींचा सहभाग राहणार आहे. या दोन दिवशीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल मोहिते करणार आहेत.
या ग्रंथोत्सवात शनिवार, दिनांक 28 जानेवारी, 2023 व रविवार 29 जानेवारी 2023 या दोन दिवसांच्या कालावधीत सकाळी 9 ते रात्री 7 या वेळेत ग्रंथ प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल ठेवण्यात येणार असून यामध्ये राज्यातील नामांकित प्रकाशन संस्था तसेच शासकीय प्रकाशनांची पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.