Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नांदेडमध्ये प्रेमसंबंधाचा भयानक शेवट; आई-बापानेच डॉक्टर मुलीला संपवलं

नांदेडमध्ये प्रेमसंबंधाचा भयानक शेवट; आई-बापानेच डॉक्टर मुलीला संपवलं


नांदेड, 27 जानेवारी : नांदेडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात ऑनर किलिंगच्या प्रकारानं खळबळ उडाली आहे. लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी माहिपाल येथे कुटुंबीयांनीच आपल्या मुलीची हत्या केल्याचं समोर आलं आहे. एवढंच नव्हे तर या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह जाळून टाकण्यात आला. त्यानंतर मृतदेहाची राख बाजूच्याच ओढ्यात टाकून देण्यात आली. शुभांगी जोगदंड असं मृत मुलीचं नाव आहे. शुभांगी ही बीएचएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती.

या प्रकरणात पोलिसांनी मुलीचे आई-वडील, दोन भाऊ आणि मामा अशा पाच जणांना अटक केली आहे. प्रेमसंबंधातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शुभांगी जोगदंड ही तरुणी नांदेड जिल्ह्यातल्या पिंपरी माहिपाल येथील रहिवासी होती. ती बीएचएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. तिचे गावातीलच एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. पण कुटुंबीयांना ते मान्य नव्हते. कुटुंबीयांनी तीन महिन्यांपूर्वीच दुसरीकडे तिची सोयरीक जुळवली होती. मात्र आठ दिवसांपूर्वी हे ठरलेलं लग्न प्रेमसबंधांमुळे मोडलं.

लग्न मोडल्यानं गावात बदनामी झाल्याच्या रागातून कुटुंबातील व्यक्तींनीच गेल्या रविवारी शुभांगीची हत्या केली. पाच जणांना अटक शुभांगी हिची हत्या करून त्यांनी तिचा मृतदेह जाळून देखील टाकला. त्यानंतर त्यांनी या मृतदेहाची राख शेजारच्या ओढ्यात नेऊन टाकली. मात्र गेल्या तीन दिवसांपासून मुलगी गावात दिसत नसल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी तपास केला असात शुभांगीची हत्या झाल्याचं समोर आलं. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. ज्यामध्ये मुलीचे आई, वडील, दोन भाऊ आणि मामा यांचा समावेश आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.