Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बंगळुरूमध्ये महिलेला फरपटत मंदिराबाहेर काढले..

बंगळुरूमध्ये महिलेला फरपटत मंदिराबाहेर काढले..


मुंबई : बंगळुरूमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने पुजाऱ्याच्या अंगावार थुंकल्याचा आरोप करत तिला चक्क फरपटत मंदिराबाहेर नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बंगळुरूमधील वेंकटेश मंदिरात ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी महिलेल्या तक्रारीनंतर मंदिराच्या पुजाऱ्यासह कर्माचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनीसार, २१ डिसेंबर रोजी एक महिला बंगळुरूमधील वेंकटेश मंदिरात शिरली होती.

यावेळी ती स्वत:ला वेंकटेशची पत्नी असल्याचे सांगत होती. तसेच तिने वेंकटेशच्या मुर्तीजवळ बसण्याचा आग्रह केला. मात्र, पुजाऱ्याने विरोध केल्यानंतर ती पुजाऱ्याच्या अंगावार थुंकली. या प्रकारानंतर मंदिरातील कर्मचाऱ्यांनी तिला फरपटत बाहेर नेले. दरम्यान, महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पुजाऱ्यासह मंदिरातील कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच ही महिला मानसिक रोगी असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.