Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिरज बंद का दिली हाक? गोपीचंद पडळकर यांच्या भावाने असं कोणत केलं काम?

मिरज बंद का दिली हाक? गोपीचंद पडळकर यांच्या भावाने असं कोणत केलं काम?


भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू आणि माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी काल मिरजमध्ये केलेल्या पाडकामाविरोधात आज मिरज बंदची हाक देण्यात आलीय. पडळकर यांनी शुक्रवारी मध्यरात्री काही दुकानं आणि हॉटेलं पाडली.  त्याचा निषेध म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट, एमआयएम, आरपीआयसह विविध सामाजिक संघटनांनी बंदचं आवाहन केलं आहे. 

दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भावाची पाठराखण करत सर्व आरोप फेटाळून लावले. ब्रह्मानंद पडळकर यांच्या प्लॉटवर झालेलं अतिक्रमण काढून घ्यावं महापालिकेनेच सांगितल्याचा दावा आमदार पडळकर यांनी केलाय. आता आजच्या महाविकास आघाडीच्या बंदला सर्वसामान्य मिरजकर कसा प्रतिसाद देतात याची उत्सुकता आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.