Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीचा पाठिंबा कोणाला?

पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीचा पाठिंबा कोणाला?


सध्या पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीची नेमकी भूमिका काय? हे आज स्पष्ट होणार आहे. आज दुपारी 12 वाजता महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी नाशिक आणि नागपूर पदवीधर मतदारसंघाबाबत महाविकास आघाडी कोणाला पाठिंबा देणार याची घोषणा करण्यात येणार आहे.

नाशिक आणि नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या बाबतीत अद्याप महाविकास आघाडीने भूमिका जाहीर केली नव्हती. या दोन्ही ठिकाणी कोणाला पाठिंबा द्यायचा याची आज घोषणा केली जाणार आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर होताच नाशिक मतदारसंघातील काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे आणि त्यांचे वडील सुधीर तांबे यांच्यामुळे जोरदार चर्चा झाली. काँग्रेसच्या उमेदवारांना भाजपकडून पाठिंब्याची चर्चा सुरु झाल्यानंतर काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांसह महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनीही आश्चर्य व्यक्त केले. नाशिकमध्ये ज्या पद्धतीने तांबे यांच्याबाबतीत जे घडले आहे ते काँग्रेससाठी गंभीर आहे. त्यामुळे आता पदवीधरबाबत विचार करताना महाविकास आघाडीतील महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले होते.

नाशिकमध्ये काय स्थिती?

नाशिक पदवीधर निवडणुकीचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झालेले आहे. या निवडणुकीत 16 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. यात दोन प्रमुख उमेदवारांमध्ये लढत होईल. एक म्हणजे सत्यजीत तांबे आणि शुभांगी पाटील. यातील शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. तर सत्यजीत तांबे यांना येत्या एक दोन दिवसात भाजपाचा पाठिंबा जाहीर होऊ शकतो. महाविकास आघाडीचे जिल्ह्यात म्हणजेच नाशिकसह उत्तर महाराष्ट्रामधल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये प्राबल्य आहे. त्यावेळेसच ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली हे स्पष्ट झालेले आहे.

नागपूरमध्ये काय होणार?

नागपूर विभागात एकूण 27 जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यापैकी पाच जणांनी आपला अर्ज मागे घेतला. विधानपरिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या रिंगणात 22 उमेदवार उभे राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसे पाहिले तर या निवडणुकीत शिक्षक किंवा शिक्षण क्षेत्राशी निगडित उमेदवारच उभे राहतात असा समज आहे. मात्र प्रत्यक्षात 50 टक्के उमेदवारदेखील विद्यमान शिक्षक नाहीत. तसेच उभ्या असलेल्या 18 टक्के उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल असून त्यात बहुतांश शिक्षकच आहेत. सध्या तीन प्रमुख उमेदवारांमध्ये लढत होणार असल्याचे चित्र आहे. या उमेदवारांमध्ये भाजप समर्थित आमदार नागो गाणार, गेल्या निवडणुकीत फक्त 2 हजार मतांनी पराभूत झालेले अपक्ष उमेदवार राजेंद्र झाडे, विदर्भ माध्यमिक शिक्षकसंघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांचा समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार सुधाकर अडबाले यांना कॉंग्रेसचे समर्थन मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.