"बरं झालं महाराष्ट्राची सुटका होणार"; राज्यापालांच्या राजीनाम्यावरुन शरद पवारांची टीका
कोल्हापूर : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रात आल्यापासूनच महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्ये केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे राज्यामध्ये राज्यपाल बदलाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेलक्या शब्दात प्रतिक्रिया देताना राज्यपालांवर बोचकी टीका केली आहे. शरद पवार आज कोल्हापूरमध्ये बोलताना राज्यपालांवर टीका केली आहे.
महाराष्ट्रामध्ये राज्यपाल कोण होणार याची चर्चा रंगली आहे. यामध्ये पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. मात्र, याबाबत अजून कोणतेही भाष्य करण्यात आलेलं नाही. याबाबत शरद पवार यांना विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, "राज्यामध्ये कोण राज्यपाल येणार हे माहित नाही. मात्र, आत्ताच्या राज्यपालांकडून महाराष्ट्राची सुटका होतेय ही चांगली गोष्ट आहे", असे शरद पवार म्हणाले आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत, 'आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो' अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली होती. त्यामुळे पदमुक्त व्हायचं आहे असं त्यांनी ठरवल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली आहे. यावर राजकीय वर्तुळातून विशेष करून महाविकास आघआडीच्या नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.