'मिरजेतील जागा आमच्या मालकीची' पडळकरांचा दावा
सांगली, 26 जानेवारी : गेल्या काही दिवसापासून चर्चेत असणाऱ्या मिरजेतील वादग्रस्त जागेबाबतचा निकाल हा दुकानदारांच्या बाजूने लागला आहे. या निकालामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर यांना दणका बसला आहे. पण, 'मिरजेतील जागा आमच्या मालकीची आहे. मिळकतदारांचा सिटी सर्व्हेचा नंबर वेगळा आणि आपल्या जागेचा नंबर वेगळा आहे, आपल्या बंधूंच्या बाजूने निकाल असल्याचा दावा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. सांगलीतील मिरजेच्या "त्या"वादग्रस्त जागेबाबत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या बंधूंच्या बाजूने निकाल असल्याचा दावा केला आहे.
ज्या 17 मिळकत धारकांनी कब्जा मिळाल्याचे सांगितलं आहे, त्यांचा आणि आमच्या मिळकतीशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केलं आहे.'तहसीलदारांनी तसाच निर्णय दिलेला आहे, आणि ज्या जागाचा वाद आहे, ती सिटीसर्वेनुसार आपल्याच कब्जात असल्याचाही तहसीलदारांच्या निर्णयानंतर स्पष्ट झालेला आहे. मात्र ज्या 17 मिळकत धारकांनी जागेचा कब्जा मिळाल्याचं सांगितला आहे. त्यांच्या सिटी सर्व्हेचा नंबर हा वेगळा आहे, आणि आपल्या जागेचा नंबर वेगळा असल्याचे भाजपा गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं आहे.त्याचबरोबर या जागेवरून आमच्यावर ज्या लोकांनी आरोप आणि टीका केली, त्यांच्यावर आता अब्रू नुकसानीचा दावा देखील दाखल करण्यात येणार असल्याचेही गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर, जी आमची जागा आहे, ती ताब्यात घेण्यासाठी आणि त्याच्यावर कोणत्या प्रकारचा अतिक्रमण करू नये, यासाठी पोलीस प्रमुख असतील किंवा संबंधित प्रशासन असेल यांच्याकडे मागणी देखील करणार असल्याचे आमदार पडळकर यांनी स्पष्ट केलं आहे. तहसीलदारांचा काय आहे निर्णय? मिरजेतील त्या वादग्रस्त जागेबाबत तहसीलदार दगडू कुंभार यांच्या दालनामध्ये बुधवारी निकाल देण्यात आला.
यामध्ये सदर पडकाम झालेली जागा ही मिळकतदारांच्याच कब्जात असल्याचे कागदपत्रे तपासल्यानंतर समोर आल्यामुळे तहसीलदार दगडू कुंभार यांनी मिळकतदारांच्या बाजूने आपला निकाल दिला आहे. तसंच पडळकर यांना या निकालाबाबत न्यायालयामध्ये दाद मागण्याची मुभा देण्यात आलेली आहे. त्यामुळे या वादग्रस्त जागे बाबत गेल्या अनेक दिवसापासून सुरू असणारी चर्चा आता थांबली आहे. यामुळे आता पडळकर यांनी बेकायदेशीर जमाव जमवून मिळकतदारांच्या मिळकती पाडण्याचा प्रयत्न केला व कब्जा करण्याचा प्रयत्न केला याबाबत मिळकतदार पुढील लढाई लढणार आहेत. तसंच आपल्या झालेल्या नुकसानीची भरपाई ते मागणार आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.