भर चौकात आरोग्य मंत्र्यावर पोलिसाने केला गोळीबार
ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा दास यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अज्ञातांकडून त्यांच्यावर गोळीबार झाला आहे.ब्रजराजनगर येथील गांधी चौकात एका कार्यक्रमादरम्यान काही अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यानंतर नाबा दास यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नबा दास यांच्या छातीवर गोळी लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाबा दास यांच्यावर गोळी त्यांच्या सुरक्षा रक्षकांमध्ये तैनात असणारे एएसआय गोपाळ दास यांनी झाडली आहे. गोपाल दास यांनी एकूण पाच गोळ्या झाडल्या आहेत. नाबा दास गाडीततून उतरताच त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.