Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शरद पवार यांचे मोठे विधान...

शरद पवार यांचे मोठे विधान...


म्हणाले-'काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढण्यास.

कोल्हापूर :  आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी, अशी माझी इच्छा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केली. यासंदर्भात महाविकास आघाडीचा अद्याप निर्णय झालेला नाही, परंतु एकत्र निवडणूक लढण्यास फार अडचण येणार नसल्याचे शरद पवार  यांनी सांगितले. ते कोल्हापूर दौऱ्यावर असून रविवारी सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

शिंदे-फडणवीस सरकारला टोला

सत्ता हतात असताना जमिनीवर पाय ठेऊन वागायचे असते. पण अलिकडच्या काळात सत्ता ज्यांच्या हातात त्यांच्याकडून चुकीची भाषा केली जात आहे. हे राजकीय नेत्यांचे खरे काम नाही. शिवसेनेत दोन गट पडले ही खरी गोष्ट आहे. परंतु जो कडवा शिवसैनिक आहे तो उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. याला कोल्हापूर देखील अपवाद नाही. काही आमदार खासदार इकडून तिकडे गेले असतील. पण उद्या येणाऱ्या निवडणुकीत जनतेच्या भावना लक्षात येतील असेही शरद पवार म्हणाले.

संजय राऊतांच्या दाव्यावर सूचक प्रतिक्रिया

शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारीत पडणार असल्याच्या संजय राऊत यांच्या दाव्याविषयी बोलताना शरद पवार म्हणाले, याबाबत मला काही माहिती नाही. आता मी मुंबईला गेल्यावर संजय राऊत यांच्याशी बोलेल आणि जाणून घेईन. सरकार पाडण्यासाठी संजय राऊत यांनी काही नियोजन केले आहे का, याबाबत मला माहिती नाही, अशी मिश्किील टिप्पणी शरद पवार यांनी केली.

अनेक राज्यपाल पाहिले पण असा राज्यपाल…

यावेळी शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. अनेक राज्यपाल या राज्यात पाहिले आहेत, त्यांनी राज्याच्या हिताचे मार्गदर्शन केले. परंतु हे राज्यपाल सतत वादग्रस्त वक्तव्य करतात. त्या पदाची प्रतिष्ठा कोश्यारी यांच्याकडून राखली जात नसल्याचे त्यांनी म्हटलं.

संभाजी महाराज स्वराज्य रक्षक

छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर स्वराज्यावर इतके हल्ले झाले. पण या सर्व हल्ल्यांना छत्रपती संभाजी महाराजांनी समर्थपणे तोंड दिले. त्यामुळे संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक म्हणणे चुकीचे नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.

सीमावादावर प्रतिक्रिया

यावेळी शरद पवार यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादवर प्रतिक्रिया दिली. सीमावादाची केस कोर्टात सुरू आहे. या पूर्वी देखील या प्रश्नावर दोन बैठका झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनीही बैठक घेऊन आपली बाजू नीट मांडण्याच्या सूचना केल्या आहेत. या प्रकरणात हरीश साळवे यांना वकील म्हणून नेमण्याबाबत सर्वांचे एकमत झाले आहे. अंतिम निर्णय आल्यास समाधानाची गोष्ट असेल असे शरद पवार यांनी म्हटले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.