ऑस्ट्रेलियाच्या मायकेल क्लार्कला लागला कोट्यावधींचा चुना..
गर्लफ्रेंडकडून झालेल्या मारहाणीमुळे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कच्या अडचणीत वाढ झाली आहे. आधी त्यांची प्रतिमा खराब झाली आणि आता त्यांचे करोडोंचे नुकसान झाले आहे. नुकताच क्लार्कचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्याची गर्लफ्रेंड जेड यारब्रो त्याला बेदम मारहाण करताना दिसत आहे. यारब्रोने त्याच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शूज आणि चप्पल बनवणाऱ्या ऑस्ट्रेलियन कंपनीने क्लार्कसोबत काम करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पादत्राणे आणि कपड्यांच्या एका प्रमुख ब्रँडने क्लार्कपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.ऑस्ट्रेलियन ब्रँडने पुष्टी केली आहे की तिचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर क्लार्कसोबत काम करण्याचा कोणताही हेतू नाही. ऑस्ट्रेलियाच्या सुप्रसिद्ध ब्रँडने सांगितले की, क्लार्कशी त्यांचे नाते गेल्या वर्षी सुरू झाले आणि गेल्या वर्षीच संपले आणि आता या वादानंतर हे नाते पुन्हा सुरू करण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही.
गर्लफ्रेंडने का केली मारहाण?
मायकल क्लार्क आणि त्याची गर्लफ्रेंड जेड यारब्रो यांच्यात जे घडलं त्याचा नेमका प्रकार काय घडला हे सविस्तर समजू शकले नव्हते. पण एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामध्ये जेड यारब्रोने क्लार्कला बेदम मारले. यारब्रोने त्याच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला. हा व्हिडिओ व्हायरल झाला, त्यानंतर चप्पल निर्मिती करणाऱ्या कंपनीनेही त्याला चांगलाच धक्का दिला.
एकदा क्लार्कबरोबर काम केले
त्यांच्या ब्रँडने क्लार्कसोबत फक्त एकदाच काम केले आहे, कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबरच्या सुरुवातीला त्याच्यासोबत फादर्स डे शूट केले होते, असे निवेदनात म्हटले आहे. आता हा ब्रँड भविष्यात पुन्हा कधीही क्लार्कसोबत काम करणार नाही. त्यामुळे भविष्यात क्लार्कचा या ब्रँडसोबत करोडोंचा करार होण्याची शक्यताही संपुष्टात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.