Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लोणावळा परिसरात फिरायला गेलेल्या सलमान खानला लुटले..

लोणावळा परिसरात फिरायला गेलेल्या सलमान खानला लुटले.. 


लोणावळा शहर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. लोणावळाच्या सहारा पूल भागात फिरायला गेलेल्या एका तरुण-तरुणीला धारदार शस्त्राचा धाक दाखवत लुटल्याची घटना रविवारी (दिनांक 22 जानेवारी) रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. याबाबत सलमान उस्मान खान (वय 19, रा. टेबल चाळ, जी वार्ड लोणावळा) याने शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान आणि त्याची मैत्रिण रविवारी रात्री लोणावळा पुलाच्या पुढे फिरायला गेले असता, त्याठिकाणी असलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवला. सलमान खान च्या गळ्याला चाकू लावून त्याच्या जवळील आयफोन, त्याच्या मैत्रिणीकडील सोन्याची चैन, चांदीची अंगटी असा 1 लाख 12 हजार 400 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. यावेळी सलमान याच्या गळ्याला आरोपींनी चाकू लावून त्यांना लुटत असताना झालेल्या झटापटीत तो जखमी झाला.

सदर प्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी तीन अज्ञात आरोपींविरोधात भादवि कलम 394, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सुरेखा शिंदे करत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.