Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका


मुंबई : अँटिलिया बॉम्बप्रकरण व मनसुख हिरेन प्रकरण राज्यात गाजले होते. याप्रकरणी मुंबई पोलिस दलातील मोठे अधिकारी जाळ्यात सापडले होते. यापैकीच एक म्हणजे एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे देखील याप्रकरणात अडकले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांचे माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारा केलेल्या कारवाईत अटकेत आहेत.

जामीन अर्ज फेटाळला : 

मुंबई उच्च न्यायालयाने अँटिलिया बॉम्बप्रकरण माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना मोठा दणका दिला आहे. अँटिलिया बॉम्बप्रकरणात दाखल करण्यात आलेला जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे प्रदीप शर्मा यांना मोठा धक्का बसला आहे. न्यायमूर्ती रेवती डेरे मोहिते आणि न्यायमूर्ती आर एन लड्डा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.मनसुख हिरेन हत्या प्रकरण : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीबाहेर स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ आढळून आली होती. ही स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांची असल्याचे तपासांत पुढे आले होते. त्यानंतर मनसुख हिरेन त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. दरम्यान, याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने यापूर्वी 7 जणांना अटक केली होती. काहीदिवसानंतर पुन्हा 3 जणांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे याप्रकरणात अटक झालेल्यांची संख्या 10 झाली होती.

कोण आहे प्रदीप शर्मा : 

प्रदीप शर्मा हे 1983 पासून मुंबई पोलीस दलात कार्यरत होते. एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून त्यांची ओळख होती. मुंबई पोलीस दलात असताना त्यांनी 113 गँगस्टरचे एन्काऊंटर केल्याची नोंद आहे. तसेच 2010 मध्ये लखन भैया बनावट एन्काऊंटर प्रकरणात त्यांना अटक झाली होती. तर 2013 मध्ये प्रदीप शर्मा जेलमधून बाहेर आले होते. त्यांना प्रदीप शर्मा यांना पुन्हा मुंबई पोलीस दलात रूजू करण्यात आले. 2017 मध्ये दाऊदचा भाऊ इकबाल कासकरला शर्मांनी अटक केली होती. त्यासोबतच त्यांनी 2019 मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर नालासोपारा विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, यात त्यांचा पराभव झाला होता.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.