Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बांधकाम कामगारांच्या नोंदणी व नुतनीकरण शुल्कात बदल

बांधकाम कामगारांच्या नोंदणी व नुतनीकरण शुल्कात बदल


सांगली : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत बांधकाम कामगाराच्या नोंदणी व नुतनीकरणातील तांत्रिक अडचणी कमी करून कामगारांची नोंदणी सुलभ होण्याच्या दृष्टीने सद्यस्थितीतील नोंदणी व नुतनीकरण शुल्कात बदल करून नोंदणी शुल्क 25 रूपये व नुतनीकरण शुल्क 12 रूपये ऐवजी नोंदणी व नुतनीकरण शुल्क एक रूपये करण्यात आले आहे. जिल्ह्यातील बांधकाम कामाच्या संबंधित काम करणाऱ्या सर्व कामगारांनी नोंदणीचा लाभ घ्यावा व एक रूपये भरून नोंदणी सुलभरित्या करून घ्यावी. कोणत्याही व्यक्तीच्या भूल थापास बळी पडू नये, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.