जत तालुक्यातील गिरगांव येथील किरकोळ वादावादीतून धारदार शस्त्राने भोसकून खून
जत तालुक्यातील गिरगांव येथील किरकोळ वादावादीतून कर्नाटकातील महादेवप्पा राजशेखर हिरेमठ ( वय ३५)रा.विजयपूर(ता.जि.विजयपूर) याचा कोणत्यातरी धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला . ही घटना शुक्रवारी रात्री गिरगांव (ता.जत) येथे घडली. याबाबत पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेले माहिती अशी की, गिरगाव येथे ग्रामपंचायत मार्फत दलित वस्ती येथे पाण्याचे टाकीचे काम चालू आहे. त्या कामांसाठी कर्नाटकातील विजयपूर येथून कामगारांना एका ठेकेदारा मार्फत आणण्यात आले होते.
मयत महादेवप्पा राजशेखर हिरेमठ व आरोपी दत्ता यल्लाप्पा बजंत्री (रा. विजयपूर, कुंभार गल्ली ) यांच्यात एकमेकात नशे मध्ये गिरगांव (ता.जत) येथील सुखदेव साबू ब्याळीकुळी यांच्या पत्रा शेडच्या कट्ट्यावर किरकोळ वादावादी झाली. आरोपी दत्ता यल्लाप्पा बजंत्री याने जिवे मारण्याच्या उद्देशाने कोणत्यातरी धारदार शस्त्राने त्याच्या उजव्या बाजूस छातीवर व बरगड्यात भोसकून खून करून फरार झाला आहे.
याबाबत फिर्यादी चुलत भाऊ प्रशांत चंद्रकांत हिरेमठ (३४)रा.जोरापूर.ता.जि.विजयपूर उमदी पोलीस ठाण्यात दिली आहे. घटनास्थळी विटा उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम यांनी भेट देऊन चौकशीचे आदेश केले. अधिक तपास उमदीचे पोलीस निरीक्षक एस .एस.शिंदे करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.