Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"प्रकाश आंबेडकरांनी जपून शब्द वापरावेत"

"प्रकाश आंबेडकरांनी जपून शब्द वापरावेत"


मुंबई : उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी युतीची घोषणा केली. या युतीनंतर पुन्हा राजकीय क्षेत्रात भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. अशातच "शरद पवार हे आजही भाजपसोबत आहेत", असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांना सुनावलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नसल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले, "प्रकाश आंबेडकर यांची शिवसेनेसी चार दिवसापूर्वीच युती झाली आहे.

सध्या शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी अशीच चर्चा झाली आहे. शरद पवार हे महाराष्ट्राचे आणि देशाचे एक मोठे नेते आहेत. जर शरद पवार भाजपचे असते तर महाराष्ट्रात अडीच वर्षापूर्वी भाजपचे सरकार दूर ठेऊन उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार येऊ दिलं नसते." "शरद पवारांनी प्रत्येक ठिकाणी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला. आजसुद्धा देशामध्ये विरोधी पक्षांच्या एकीचा आपण विचार करतो, तेव्हा आपण शरद पवार यांचे नाव घेतो.

कारण सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्याचे काम शरद पवार करु शकतील", असंही संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले. पुढे ते म्हणाले, "सध्या शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली आहे. पुढील काळात ते महाविकास आघाडीचे घटक व्हावेत अशी आमची इच्छा आहे. परंतु, असं होणार असेल तर त्यांनी या आघाडीचे जे प्रमुख स्तंभ आहेत त्यांच्यावर बोलू नये. प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका घेताना जपून शब्द वापरायला हवेत."


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.