Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चुकूनही 'या' गोष्टी चहाबरोबर खाऊ नका

चुकूनही 'या' गोष्टी चहाबरोबर खाऊ नका


चहा प्यायला कोणाला आवडत नाही. बहुतेक लोकांची सकाळची सुरुवातच चहाने होते. काहींना चहा बिस्किटांबरोबर आवडतो तर काहींना स्नॅक्सबरोबर आवडतो. दिवसभराचा कामाचा थकवा दूर करण्यासाठी असो किंवा बिघडलेला मूड सुधारण्यासाठी चहा प्रत्येक समस्येवर रामबाण उपाय आहे. पण, तुम्हाला माहित आहे का की, प्रत्येक खाद्यपदार्थ चहाबरोबर खाणं योग्य नाही. 

चहा पिताना आपण अनेकदा या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो की चहाबरोबर खाल्लेल्या काही गोष्टींचा आपल्यावर वाईट परिणाम होतो. तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तुम्ही काही पदार्थ चहाबरोबर खाणं तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.   

1. लोहयुक्त पदार्थ : विशेषतः चहा पिताना हिरव्या पालेभाज्या, मसूर, धान्ये यांसारखे लोहयुक्त पदार्थ खाणे टाळावे. तज्ज्ञांच्या मते, चहामध्ये टॅनिन आणि ऑक्सलेट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराला या पदार्थांमधून लोह शोषण्यापासून रोखतात.

2. लिंबू : लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मात्र, दुधाच्या चहाबरोबर लिंबाचं सेवन करणे योग्य नाही. जरी लिंबू चहा वजन कमी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण चहाची पाने लिंबूमध्ये मिसळल्याने तुम्हाला जास्त अॅसिडिटी, ढेकर येणे आणि अॅसिड रिफ्लक्स सारख्या समस्या येऊ शकतात. लिंबू चहा सकाळी कधीही पिऊ नये. जर तुम्ही आधीच अॅसिडिटीच्या समस्येने त्रस्त असाल तर तुमच्यासाठी लेमन टी टाळणेच चांगले.

3. डाळींचं पीठ :

चहा आणि पकोड्यांचे कॉम्बिनेशन कोणाला आवडत नाही. पावसाळा आला की लोकांच्या मनात सगळ्यात पहिली गोष्ट येते ती म्हणजे चहा आणि पकोडे खाणे. पण तुम्हाला माहित आहे का की कुरकुरीत किंवा चविष्ट पकोडे हा सर्वात हानिकारक खाद्यपदार्थांपैकी एक आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, बेसनाचे पीठ रक्तातील पोषकद्रव्ये शोषून घेण्यापासून रोखते. त्यामुळे पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते.

4. थंड पदार्थ : आईस्क्रीमसारखे थंड पदार्थ चहाबरोबर कधीही खाऊ नयेत. हे पदार्थ पचन प्रक्रियेत अडथळा आणण्याचे काम करतात. वेगवेगळे तापमान असलेले अन्नपदार्थ खाणे किंवा पिणे यामुळे पचनक्रिया कमजोर होऊ शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गरम चहा प्यायल्यानंतर सुमारे 30 ते 45 मिनिटे थंड काहीही खाऊ नये.

5. हळद :

हळद हा सर्वोत्तम आणि प्रभावी मसाला आहे, ज्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हळद तुम्हाला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी खूप मदत करते. पण, हळद कोणत्याही प्रकारे चहामध्ये मिसळ्यास हानिकारक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, चहामध्ये हळद मिसळल्याने अपचन आणि छातीत जळजळ होऊ शकते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.