तेल व्यापारी संतोष देशमाने यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल
सांगली : राज्य वस्तू व सेवाकर कार्यालय सांगली, अंतर्गत नोंदीत असलेल्या मे. संतोष कुमार देशमाने, मे महालक्ष्मी टेडीग कंपनी, मे महेश ज ऑईल्स, मे महालक्ष्मी ऑईल इंडस्ट्रीज, या व्यापा-यांकडे एकूण ८४.७७ कोटी रूपये इतका मूल्यवर्धीत कर (जीएसटी) थकीत होता. चारही कंपन्या या संतोष देशमाने यांचेशी संबंधीत असून खादयतेलाच्या विक्रीबाबत विक्रीकर खात्याची मुंबईतील अन्वेषण शाखा मुंबई यांचेकडून या कंपन्यांवर कारवाई करणेत आली होती. त्या अनुषंगाने सदर कंपन्यांनी विक्रीकर चुकविल्याचे कारवाईत निष्पन्न झाले होते. त्यामुळे देशमाने यांच्यावर इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी संतोष देशमाने सुनिता संतोष देशमाने, महेशकुमार जाधव यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. राज्यकर सहआयुक्त सुनिता थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुविल कानगुडे व संजय माने यांनी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केली आहे. पुढील तपास इस्लामपूर पोलीस करीत आहेत. हे व्यापारी प्रामुख्याने खादयतेलाच्या फेरविक्रीचा व्यावसाय करीत होते. त्या अनुषंगाने त्यांचेकडे असलेल्या थकबाकीसाठी वारवार पाठपुरावा करून देखील सदर थकबाकी त्यांनी भरली नाही. त्यामुळे फेब्रुवारी २०१२ मध्ये संबंधीत व्यापा-यांना पोलीस अभियोग प्रस्तावाबाबतची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. सदर नोटीसीबाबत व्यापा-यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र शासनाने अभय योजना २०१२ जाहीर केली. सदर योजनेचा फायदा घेणेसाठी देखील संबंधीत व्यापा-यांना कळविले असता त्यानी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे त्यांचे विरुदध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष देशमाने यांच्याकडे २०११-१२ व २०१२-१३ या कालावधीसाठी १.४२ कोटी रूपये इतकी थकबाकी होती. सुनिता संतोष देशमाने यांच्याकडे २०१२-१३ २०१३-१४ व २०१४-१५ या कालावधीसाठी २९.७३ कोटी रूपये इतकी थकबाकी होती. तर महेशकुमार जाधव यांच्याकडे २०१२-१३ २०१३-१४, २०१४-१५ व २०१५-१६ या कालावधीसाठी १६.९० कोटी रूपये इतकी थकबाकी होती. संतोष विष्णू देशमाने यांच्याकडे २०१५-१६, २०१६-१७ व २०१७-१८ या कालावधीसाठी ३६.७२ कोटी इतकी थकबाकी होती. तिघांनीही थकबाकी न भरल्याने सोमवारी त्यांच्याविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे.
महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाअंतर्गत प्रलंबित थकबाकी वसुलीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सांगली जिल्हयातील मोठ्या थकबाकीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तरी कोल्हापूर विभागातील सर्व थकबाकीदार व्यापाऱ्यांनी त्यांचेकडील थकबाकीचा भरणा ताबडतोब करावा अन्यथा त्योचेविरुद्ध दमनकारी कार्यवाही वेळी जाईल, असा इशारा राज्यकर सहआयुक्त सुनीता थोरात यांनी दिला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.