डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात अंमलात आणण्याचा प्रयत्न डॉ. सुषमा कांबळे यांनी केला..
कवठेमहांकाळ दिं.२७ शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात अंमलात आणण्याचा प्रयत्न डॉ. सुषमा कांबळे यांनी केला आहे त्यामुळेच लग्नानंतर मुलं झाल्यानंतरही आपले शिक्षण न थांबवता त्या पदवीधर तर झाल्याच कायद्याची पदवीही घेतली. यावर समाधान न मानता त्यांनी अत्यंत अवघड अशा योगशास्त्रात डॉक्टरेट मिळवली त्यांचा आदर्श इतरांना प्रेरणादायी असा आहे असे उद्द्गार आटपाडीच्या श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय लोंढे यांनी काढले.
हिंगणगावची सुकन्या अॅड.सुषमा चंद्रकांत कांबळे यांनी बौद्ध "दर्शनातील निर्वाण व योग दर्शनातील कैवल्य संकल्पना यांचा सामाजिक सामंजस्याचे विश्लेषणात्मक अध्ययन" या विषयावर कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक नागपूर येथील विश्वविद्यालयातून पी.एच.डी. ची पदवी मिळवली त्याबद्दल त्यांचा हिंगणगाव ग्रामपंचायत, बौद्ध सेवा संघ हिंगणगाव आणि आस्था ग्रुपच्या वतीने नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्राचार्य डॉ. लोंढे अध्यक्षपदावरुन बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हिंगणगांवच्या सरपंच प्रिया राहुल सावळे, उपसरपंच नितीन पाटील , कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक अजय भोसेकर ,उद्योजक देवानंद लोंढे, माजी शिक्षण अधिकारी डी.सी. लोंढे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कांबळे, अॅड. चंद्रकांत कांबळे, माजी पंचायत समिती सदस्य सोनाली लोंढे उपस्थित होते.
शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती नाही हे सत्य ओळखून अॅड. सुषमा कांबळे व त्यांचे पती अॅड. चंद्रकांत कांबळे हे स्वतः उच्चशिक्षित तर आहेतच पण त्यांनी आपल्या तीनही मुलांना उच्च शिक्षण दिले.दोन मुले कायद्याचे पदवीधर आहेत तर एक अभियंता आहे.असे सांगून प्राचार्य डॉ . लोंढे म्हणाले, डॉ.सुषमा कांबळे यांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
यावेळी बोलताना कवठेमंकाळ उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक अजय भोसेकर म्हणाले कुटुंबातील स्त्री शिकली तर सर्व कुटुंब सुशिक्षित बनते. लग्नानंतर संसाराचा संसाराचा व्याप सांभाळ डॉक्टर सुषमा कांबळे केवळ कायद्याची पदवी घेतली असे नाही तर त्यांनी अत्यंत अवघड अशा विषयावर प्रबंध सादर करून मानाची पीएचडी पदवी संपादन केली आहे शिक्षणाबद्दल असता असेल तरच हे घडू शकतं त्यांच्या शिक्षणाच व ज्ञानाचा उपयोग समाजासाठी व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी हिंगणगावच्या सरपंच प्रिया राहुल सावळे ,अमर पाटील, माजी शिक्षणाधिकारी डी.सी. लोंढे, शकुंतला कांबळे, संपत वाघमारे यांची भाषणे झाली. यावेळी कोंगनोळी ग्रामस्थांच्या वतीने अँड.डॉ.सुषमा कांबळे, आणि अँड.चंद्रकांत कांबळे या पती,पत्नीचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवियत्री सुरेखा कांबळे यांनी केलं तर शेवटी सचिन कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरज लोंढे व आस्था ग्रुप आणि बौद्ध सेवा संघाच्या पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.