Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उदगाव शाखेच्या आधुनिक कार्यालयाचे लोकार्पण कर्मवीर पतसंस्था ग्राहक सेवेसाठी सदैव तत्पर राहील. चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील.

उदगाव शाखेच्या आधुनिक कार्यालयाचे लोकार्पण कर्मवीर पतसंस्था ग्राहक सेवेसाठी सदैव तत्पर राहील. चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील.


उदगाव: कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या सांगलीच्या शाखा उदगावचे प्रशस्त आधुनिक कार्यालयामध्ये रुपांतर करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील हे होते. याप्रसंगी संस्थेच्या कार्याची माहिती यांनी उपस्थित सभासद ठेविदारांना दिले. संस्थेच्या ठेवी ८३५ कोटी असून संस्थेने ५७५ कोटीचे कर्ज वाटप केले आहे संस्थेचे भागभांडवल २९ कोटी असून संस्थेच्या स्वनिधी ७५ कोटी इतका आहे. संस्थेची गुंतवणूक ३३१ कोटी आहे. संस्थेची सभासद संख्या ५३,५००/- इतकी आहे. संस्थेला सतत ऑडीट वर्ग “अ” असून संस्थेचे खेळते भांडवल ९८० कोटी इतकी आहे.

"यावेळी त्यांनी संस्था सभासदाना विमा सुविधा उपलब्द करून देणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर पुढील दोन वर्षात संस्था २००० कोटी ठेवीचा उद्धिष्ठ पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संस्था आधुनिक सुविधासह उत्कृष्ठ ग्राहक सेवेसाठी सदैव प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी उदगाव शाखा सल्लागार वतीने नूतन चेअरमन व्हा. चेअरमन व संचालक मंडळाचा सत्कार केला उदगाव शाखेने अल्पवधी काळात २७ कोटीच्या ठेवी जमा केल्या आहेत व २० कोटीचे कर्ज वाटप केले आहेत उत्कृष्ठ सेवा देणारी शाखा म्हणून उदगाव शाखेने नावलौकिक प्राप्त केला आहे.


या वेळी उदगा ंव शाखेचे सल्लागार श्री सुहास भरमू मगदूम, श्री आप्पासो श्रीपाल मगदूम, श्री सुभाष भूपाल मादनाईक यांचे सह तात्यासो देसाई सुरगोंडा पाटील युवराज वरेकर मेघराज वरेकर प्रकाश नुले सुभाष कर्वे राजु मगदुम कुमार पाटील यांचे सह मोठ्या संखेने ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांचेसह व्हा. चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे श्री अँड. एस. पी. मगदुम डॉ. रमेश वसंतराव ढबू डॉ एस. बी. पाटील (मोटके) श्री वसंतराव धुळाप्पाण्णा नवले. श्री लालासो भाऊसो थोटे उपस्थित होते. शेवटी आभार संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदुम यांनी मानले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.