Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रोहित आर. आर. पाटील यांचा इशारा

रोहित आर. आर. पाटील यांचा इशारा


आर. आर. आबांच्या कार्यकर्त्याला हात लागणार असेल, तर गाठ थेट रोहित पाटलाशी असेल, असा खणखणीत इशारा राष्ट्रवादीचे रोहित आर. आर. पाटील यांनी दिला आहे. तसेच, ज्या गावच्या बोऱया त्याच गावच्या बाभळी, त्यामुळे आम्ही बांगडय़ा भरल्या नाहीत, असा सज्जड दमदेखील त्यांनी भाजप खासदार संजय पाटील यांना लगावला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते मणेराजुरी येथे नवनियुक्त सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रोहित पाटील बोलत होते.

रोहित पाटील म्हणाले, तासगाव मतदारसंघामध्ये आबांचा मुलगा म्हणून केवळ रक्ताचा वारसदार म्हणून नव्हे तर आबांच्या विचारांचा वारसदार म्हणून आपण वावरत आहोत. सर्वसामान्य जनतेला अधिक सुविधा देण्यासाठी आपले काम आबांच्या विचारानुसार आहे. अजितदादा तुम्ही राज्यासाठी 'दादा' असाल, पण आमच्या तालुक्यासाठी तुम्ही 'आबा' आहात, असेही ते म्हणाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.