Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लोकांची इच्छा असेल तर, राहुल गांधींना पंतप्रधान व्हावे लागेल; खासदार संजय राऊत

लोकांची इच्छा असेल तर, राहुल गांधींना पंतप्रधान व्हावे लागेल; खासदार संजय राऊत 


जम्मू : काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या काश्मीरमध्ये पोहचली आहे. या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेत शिवसेना खासदार संजय राऊत सहभागी झालेले आहेत. दरम्यान, जम्मूत जरी पाऊस असला तरी, यात्रेत सहभागी होणाऱ्यांची संख्या मोठी आहे, या यात्रेच्या वेळी खासदार संजय राऊत यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. राहुल गांधी यांना पंतप्रधान बनायचे नाही. तसे त्यांनी अनेकदा सांगितले आहे, मात्र लोकांची इच्छा असेल आणि लोकांनी ठरवले तर राहुल गांधी यांना पंतप्रधान व्हावे लागेल, असे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. त्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे. 

पुढे बोलतना संजय राऊत म्हणाले की, व्यक्ती आणि नेतृत्वात फरक करणार नाही. राहुल गांधी तेच आहेत. राहुल गांधींची जी भाजपने प्रतिमा तयार केली आहे. ती चुकीची आहे. तुमच्या मनातील राहुल गांधी यांची जी प्रतिमा आहे. ती लोकांनी तोडली आहे. राहुल गांधी ४५०० किमीपेक्षा अधिक अंतर पायी चालत आहेत. हे हिंमतीचे काम आहे. त्याकडे आम्ही राजकारण म्हणून पाहत नाही. त्यामुळेच शिवसेना या यात्रेत सामील झाली, असे संजय राऊत यांनी म्हटले. तसेच या यात्रेला लोकांनी तुफान प्रतिसाद दिला आहे, यावरुन काँग्रस व राहुल गांधींना त्यांचा पाठिंबा आहे, हे सिद्ध होतंय असं राऊत म्हणाले. तसेच ३७० कलम हटविले मात्र येथे तरुणांना रोजगार कुठे आहे? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, भाजपा राहुल गांधी व भारत जोडो यात्रेची खिल्ली उडवत आहे, राहुल गांधींना पप्पू असे संबोधन भाजपाने केले आहे, पण यात लोकांनी आता बदल घडवून आणला आहे. भारत जोडो यात्रा ही राजकीय नाही. त्याकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहू नका, असे आवाहन संजय राऊत यांनी केले. तसेच थर्ड फ्रंटचा प्रयोग अनेकदा झाला. तो अपयशी झाला आहे. सेकंड, थर्ड फ्रंटच्या गोष्टी सोडल्या पाहिजे. वेगवेगळे गट चालू शकत नाहीत. काँग्रेसशिवाय कोणताही फ्रंट चालू शकत नाही. पंतप्रधानपदाबाबत २०२४ नंतर ठरवू. लोकांना जर वाटत असेल, राहुल गांधी यांनी पंतप्रधान बनावे तर त्यांना बनावे लागेल.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.