Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लाचखोरीत किंचित घट!

 लाचखोरीत किंचित घट! राज्यात गेल्या वर्षी ७२३ प्रकरणांमध्ये १,०२४ लाचखोर अटकेत.


मुंबई : सन २०२२ मधील राज्यातील लाचखोरीचा आढावा घेतला, तर गेल्या वर्षी लाचखोरीत किंचित घट झाल्याचे दिसून येत आहे. २०२१ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७५५ प्रसंगात सापळे लावून १०६४ लाचखोरांना अटक केली होती. २०२२मध्ये सापळे आणि लाचखोर या दोन्हीच्या संख्येत घसरण झाली आहे. आतापर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७२३ सापळे लावून १०२४ लाचखोरांना पकडले आहे, तर बेहिशेबी मालमत्ता आणि अन्य भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात ५९ आरोपींची धरपकड करण्यात आली आहे. मार्चमध्ये सर्वाधिक म्हणजे ८५ सापळे लावण्यात आले होते. त्या महिन्यात लाचखोरीप्रकरणी १०७ आरोपींना पकडण्यात आले. जूनमध्ये सर्वाधिक म्हणजे १२६ आरोपी पकडण्यात आले.

लाचखोरीची आकडेवारी

वर्ष.... २०२०.... २०२१.... २०२२

सापळे.... ६३०.... ७६४.... ७२३

बेहिशेबी मालमत्ता.... १२.... ७.... १२

भ्रष्टाचार.... २१.... २.... ९

विभागानुसार सांख्यिकी

विभाग.... गुन्हे.... आरोपी

मुंबई.... ४....२ ६०

ठाणे.... ८३.... १२४

पुणे.... १५५.... २२३

नाशिक.... १२४.... १७४

नागपूर.... ७४.... १०१

अमरावती.... ६४.... १०८

औरंगाबाद.... १२१.... १५४

नांदेड.... ६०.... ८०

कोठे किती कारवाई?

- सिंधुदुर्गात सर्वात कमी म्हणजेच केवळ तीन सापळे

- पुण्यामध्ये सर्वाधिक ६२ सापळ्यांची नोंद

- नाशिक आणि औरंगाबाद शहर लाचखोरीत मुंबईच्याही पुढे

- वर्षभरात ३८ लाखाचोरांवर दोष सिद्ध झाले

- दोष सिद्ध झालेली सर्वाधिक प्रकरणे महसूल विभागातील

- गुन्हे दाखल होऊनही १९८ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अद्याप निलंबन नाही

- शिक्षा होऊनही अजून १९ अधिकारी, कर्मचारी शासकीय सेवेत




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.