Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबईच्या तरूणाचे बेलारूसच्या तरूणीसोबत लग्न..

मुंबईच्या तरूणाचे बेलारूसच्या तरूणीसोबत लग्न..


वडिल झाल्यावर सरकारने दिले 'इतके' पैसे

देशभरात लग्नाचा माहोल सुरु आहे. जागोजागी ढोल-नगाडे वाजतायत, वराती निघतायत,असे सर्व चित्र आहे. सोशल मीडियावरही लग्नाचा ट्रेंड दिसून येत आहे. कारण लग्नाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशात एका लग्नाची गोष्ट समोर आली आहे. या घटनेत एका मुंबईच्या तरूणाने बेलारूसच्या तरूणीसोबत लग्नगाठ बांधलीय.या अनोख्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.  

अशी झाली दोघांची भेट 

मुंबईकर मिथिलेश मार्च 2021 मध्ये पहिल्यांदा रशियाला गेला होता. प्रियांशू नावाच्या एका व्यक्तीने त्याला बेलारूसला येण्याचा सल्ला दिला. यानंतर मिथिलेश बेलारूसला पोहोचला होता. येथे मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत मिथिलेशची लिसाशी पहिली भेट झाली. दोघांची भेट तर झाली पण दोघांना एकमेकांच बोलण अजिबात कळत नव्हत. कारण लिसाला रशियन आणि मिथिलेशला इंग्रजी येत होते. त्यामुळे सुरूवातीला त्यांना बोलताना फार अडचणी आल्या.त्यावेळी एका ट्रान्सलेटरद्वारे त्यांना बोलावे लागले होते.  

लग्नाच्या बेडीत अडकले

दरम्यान पहिल्या भेटीनंतर अनेकदा मिथिलेश आणि लिसा सतत भेटत गेले. अशाच एका भेटी दरम्यान मिथिलेशने लिसाला प्रपोज केले. लिसाने मिथिलेशचा प्रपोजल स्विकारला. त्यानंतर अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी पुढे जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. 25 मार्च रोजी दोघे लग्नबंधनात अडकले. या लग्नात दोघांचे कूटूंबीय उपस्थित होते. 

दोघे बनले आई-वडिल 

लग्नाच्या काही वर्षानंतर लिसाने एका मुलाला जन्म दिला आहे. यावेळी लिसा हिची नॉर्मल डिलिव्हरी झाली होती. जेव्हा लिसाने मुलाला जन्म दिला तेव्हा त्याचे वजन सुमारे 4 किलो होते. आता तो 2 महिन्यांचा झाला आहे, अशी माहिती मिथिलेश यांनी त्यांच्या यु्ट्यूब चॅनलवर दिली आहे. 

मुलाच्या जन्मानंतर सरकारची आर्थिक मदत

लग्नानंतर मिथिलेश लिसासोबत बेलारूसमध्येच स्थायिक झाला होता. आता त्यांच्या मुलाच्या जन्मानंतर त्यांना बेलारूस सरकारकडून भरीव रक्कम मिळाली. बेलारूसमध्ये मुलाच्या संगोपनासाठी सरकारच्या वतीने पालकांना पैसे दिले जातात. मिथिलेश जेव्हा वडील झाला तेव्हा त्याला सुरुवातीला 1 लाख 28 हजार रुपये मिळाले असल्याचे तो सांगतोय. यानंतर त्यांना तीन वर्षांपर्यंत प्रत्येक महिन्याला 18000 रुपये मिळतील. हे पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा केले जातील. मात्र जर तुम्ही बेलारूसमध्ये रहात असाल तरच ही रक्कम उपलब्ध होते, असे देखील तो येथे सांगतोय. 

मिथिलेश हा एक ट्रॅव्हल ब्लॉगर आहे. अलीकडेच मिथिलेशने त्याच्या यूट्यूब चॅनलवर मुलाबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो त्याच्या लव्हस्टोरीची, लग्नाची आणि पहिल्या मुलाची माहिती देत आहे. दरम्यान मिथिलेशचे हे स्वतःचे युट्यूब चॅनल आहे. त्यांचे या चॅनलवर 9 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. सध्या त्याने अपलोड केलेल्या त्या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.