Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या गळाला?

काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या गळाला?


पुणे : भाजप काँग्रेसला एक भलंमोठं खिंडार पाडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या सुरु झालीय. काँग्रेसचा एक बडा नेता सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चांगलाच संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसचा हा बडा नेता भाजपच्या गळाला लागल्याचे बोलले जात आहे.

पडद्यामागे महत्त्वाच्या घडामोडी घडत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे संबंधित काँग्रेस नेत्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बारामती दौऱ्याकडे पाठ फिरवलीय आणि ते देवेंद्र फडणवीस उपस्थित असलेल्या कार्यक्रमस्थळी गेले आहेत.

काँग्रेस नेते संग्राम थोपटे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची माहिती समोर आलीय डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकमात देवेद्र फडणवीस उपस्थित असलेल्या कार्यक्रमस्थळी गेले आहेत. तेथे फडणवीस आणि थोपटे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. असं असताना संग्राम थोपटे यांनी नाना पटोले यांच्या बारामती दौऱ्याकडे पाठ फिरवली आहे. भाजप आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून संग्राम थोपटे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झालीय. दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि संग्राम थोपटे यांच्या भेटीमुळे काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.