Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ठाकरे-आंबेडकर युतीसंदर्भात शरद पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया

ठाकरे-आंबेडकर युतीसंदर्भात शरद पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया


राज्यात शिवसेनेचा वाद निवडणूक आयोगासमोर सुरु आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत युती होणार असल्याची चर्चा आहे. तसेच आज यासंदर्भात घोषणा होणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं युतीचं ठरलं की घोषणा होईल. तसेच आमचा राष्ट्रवादी आणि काँग्रेसला विरोध नसल्याचे त्यांनी सांगितले.  

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्यसोबत बोलणी सुरु आहेत. अधिकृत घोषणा मी किंवा पक्षाच्या अध्यक्षा रेखाताई ठाकूर करतील. उद्धव ठाकरेंचं ठरलं की घोषणा होईल. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला  बरोबर घ्यावं असं शिवसेनेला वाटत आहे. दोन्ही पक्षांचे स्वागतच करू. माझा दोन्ही पक्षांना विरोध नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युती संदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार  यांना विचारलं. त्यावर उत्तर देताना सांगितलं की, 'मला याबाबत काही माहिती नाही'. मी या भानगडीत पडत नाही, असं उत्तर शरद पवार यांनी दिलं.

हे तिसरं इंजिन राष्ट्रवादी आहे की मनसे

काँग्रेस-राष्ट्रवादीने आम्हाला नाकारलं आहे. वंचित आघाडीने फक्त दलितांपुरतं मर्यादित राहावं. ही काँग्रेस-राष्ट्रवादीची अट आहे. ती आम्हाला मान्य नाही. तसेच, आम्हाला तिसरं इंजिन जोडणार आहे, असं एकनाथ शिंदे मुंबईतील भाषणात बोलले होते. हे तिसरं इंजिन राष्ट्रवादी आहे, की मनसे याचा खुलासा एकनाथ शिंदे करतील, असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.