Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोबाइल रिचार्ज महागला; आता मोजा किमान १५५ रुपये

मोबाइल रिचार्ज महागला; आता मोजा किमान १५५ रुपये


नवी दिल्ली : भारती एअरटेलने मोबाइल रिचार्जच्या दरात तब्बल ५७ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हरियाणा आणि ओडिशासह आता अन्य ७ सर्कलमध्येही किमान मासिक प्रीपेड रिचार्ज प्लॅनचे दर वाढविण्याची घोषणा कंपनीने केली आहे.

आता ग्राहकांना मोबाइल रिचार्जसाठी ९९ रुपयांच्या ऐवजी किमान १५५ रुपये मोजावे लागतील. या निर्णयामुळे कंपनीचा प्रति वापरकर्ता सरासरी महसूल वाढण्यास मदत होईल. येणाऱ्या काही दिवसांत कंपनी संपूर्ण देशात नवे दर लागू करू शकते. त्याचा मोठा फटका ग्राहकांना बसणार आहे.

प्लॅनमधील फरक

१५५ रुपयांच्या नव्या रिचार्ज प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अमर्याद कॉलिंग सुविधा मिळेल. २८ दिवसांच्या वैधता कालावधीत १ जीबी इंटरनेट डाटा उपलब्ध आहे.

रिचार्जच्या किमती वाढणे चिंताजनक

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी म्हटले की, डेटा आणि उपकरणांच्या वाढत्या किमती ही डिजिटलायझेशनच्या वेगाने प्रसारासाठी चिंतेची बाब आहे. एअरटेलने मासिक रिचार्जमध्ये वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्र्यांचे हे वक्तव्य आले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.