Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'बाथरूमला जाऊ द्या' दारुडा ACP रात्री शिरला लोकांच्या घरात..

'बाथरूमला जाऊ द्या' दारुडा ACP रात्री शिरला लोकांच्या घरात..


औरंगाबाद, 15 जानेवारी : औरंगाबाद शहरामध्ये पोलिसांची मान शरमेनं घालवणारे कृत्य एका पोलीस अधिकाऱ्याने केलं आहे. दारूच्या नशेत या पोलिसांनी एका महिलेच्या घरात घुसून धिंगाणा घातला. त्यामुळे संतापलेल्या लोकांनी एसीपीला पोलिसांच्या हवाली केलं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या पोलिसावर कारवाईची मागणी केली. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका उच्चभ्रू परिसरात शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. एसीपी विशाल धुमे असं या अधिकाऱ्याचे नाव आहे.

दारूच्या नशेत तर्राट झालेला विशाल धुमे याला काही सुधरत नव्हते. त्याने एका घरात घुसण्याचा प्रयत्न केला आणि मला घरातलं बाथरूम वापरू द्या, अशी मागणीच केली. एवढ्या रात्री दारूच्या नशेत एक पोलीस अधिकारी दारावर आल्यामुळे घरातील सदस्य घाबरून गेले. त्यांनी या विशाल धुमेला इथून जाण्यास सांगितले. पण, दारूच्या नशेत टूल असलेल्या या अधिकाऱ्याने अरेरावी सुरू केली. त्यामुळे या परिसरातील नागरिक गोळा झाले. त्यांनी आधी या अधिकाऱ्याची समजूत काढली पण तो काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. त्याची अरेरावी सुरूच होती.

अखेर संतापलेल्या नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन एसीपी धुमेला ताब्यात घेतले. दरम्यान, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज सकाळी पोलीस ठाण्यात दाखल झाले. या पोलिसाने घरातील सदस्यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला.'मला सकाळी काही कार्यकर्त्यांनी फोन केला होता. एसीपी धुमाळे नावाच्या या पोलीस अधिकाऱ्याने दारूच्या नशेत घरात घुसला होता. जर कुंपनच शेत खात असेल तर ते चुकीचे आहे. पोलीस हे कायद्याचे रक्षक आहे. याबद्दल तक्रार झाली आहे. रात्री 2 ते अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी असं वागत असेल तर अशा प्रवृतीचे जागीच खच्चीकरण झाले पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.