नितीन गडकरी; देशातील सुमारे 9 लाख गाड्या 1 एप्रिलपासून रस्त्यावरून होणार गायब
नवी दिल्ली: वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जुन्या गाड्याबाबत केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंधरा वर्षापेक्षा जुन्या सरकारी गाड्या 1 एप्रिलपासून रस्त्यावर चालवण्यापासून बंदी आणणार असल्याची माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी दिली आहे. त्यामुळे 9 लाख सरकारी वाहने रस्त्यावरून गायब होणार आहेत. या वाहनांच्या बदल्यात नव्या कार उपलब्ध करून देण्यात येतील. ही वाहने केंद्र, राज्य सरकारे, परिवहन विभाग, सार्वजनिक क्षेत्रात सध्या सक्रीय आहेत. प्रदुषणाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे.
1 एप्रिलपासून नवीन वाहने.
दरम्यान, पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 1 एप्रिलपासून सर्व 15 वर्षे जुन्या केंद्र आणि राज्य सरकारी वाहनांची नोंदणी रद्द केली जाईल आणि स्क्रॅप केली जाईल. प्रदूषण करणाऱ्या बस आणि कारच्या जागी नवीन वाहने लावण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे हवेतील प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होईल, असे नितीन गडकरी म्हणाले. FICCI द्वारे आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करताना नितीन गडकरींनी ही माहिती दिली.
नऊ लाखांहून अधिक वाहने स्क्रॅप
केंद्र सरकार इथेनॉल, मिथेनॉल, बायो-सीएनजी, बायो-एलएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुलभ करण्यासाठी अनेक पावले उचलत आहे. आम्ही आता 15 वर्षांपेक्षा जुनी नऊ लाखांहून अधिक वाहने स्क्रॅप करण्यास मान्यता दिली आहे असं त्यांनी सांगितले. त्यामुळं 15 वर्षापेक्षा जुनी वाहने आता स्क्रबमध्ये काढली जाणार आहेत. जुन्या वाहनांची मुदत 31 मार्चपर्यंत आहे, या निर्णयामुळं 1 एप्रिलपासून नवीन वाहने रस्त्यावर दिसणार आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.