Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अदानींच्या संपत्तीत 80 हजार कोटींची घट

अदानींच्या संपत्तीत 80 हजार कोटींची घट


श्रीमंतांच्या यादीतीत तिसरे स्थानही गमावले

अमेरिकेतील गुंतवणूकदार रिसर्च फेम Hindenburg Research LLC जाहीर केलेल्या एका अहवालामुळे जगातील सर्वात धनाढ्य लोकांमध्ये वर्णी लागणारे उद्योजक गौतम अदानी यांचा मोठा फटका बसला आहे. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये बुधवारी घसरण पहायला मिळाली. यामुळे त्यांच्या संपत्तीमध्येही घट झाली असून श्रीमंतांच्या यादीमध्ये अॅमेझॉनचे सह-संस्थापक जेफ बेझोस गौतम अदानी यांना मागे टाकून जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

अदानी समूहाने आपल्या कंपन्यांना 85 टक्क्यांपेक्षा अधिक मूल्यवान दाखविण्यात आले आहे. अदानी समूह मोठ्या कर्जामुळे दबाबाखाली येऊ शकतो असे Hindenburg Research LLC ने आपल्या अहवालात म्हटले आहे. हा अहवाल प्रसिद्ध होताच गुंतवणूकदारांमध्ये चलबिचल झाली आणि त्यांनी विक्रीचा सपाटा चालू केला. यामुळे अदानी समूहाच्या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याचे पहायला मिळाले. याचा फटका अदानींसह गुंतवणूकदारांनाही बसला. अवघ्या काही तासात गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले.

80 हजार कोटींचा फटका

Hindenburg Research LLC च्या अहवालानंतर अदानी समूहाचे शेअर जवळपास 8 टक्क्यांपर्यंत खाली आले. याचा फटका सर्वेसर्वा गौतम अदानी यांना देखील बसला आहे. अदानी यांच्या संपत्तीत मोठी घट झाली. एकाच दिवसात अदानी यांच्या संपत्ती सुमारे 80 हजार कोटी रुपयांची घट झाली आहे. दरम्यान, अदानी समूहाचे शेअर पडल्याने शेअर बाजारावरही दबाव आला. दिवसअखेर सेन्सेक्स 774 अकांनी घसरून 60,205, तर निफ्टीमध्ये 226 अकांनी घसरून 17,891वर बंद झाला.

निव्वळ फालतूपणा

दरम्यान, अदानी समूहाने हा अहवाल म्हणजे निव्वळ फालतूपणा असल्याची म्हटले आहे. हा अहवाल धक्कादायक असून अदानी समूहाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याचा निर्लज्ज व भ्रष्ट हेतू आहे. Hindenburg Research LLC ने 24 जानेवारी, 2023 रोजी आमच्याशी संपर्क साधण्याचा किंवा तथ्यात्मक आकडेवारीची पडताळणी करण्याचा प्रयत्न न करता अहवाल प्रकाशित केला. हा अहवाल चुकीच्या माहितीच्या आधारावर असल्याचे अदानी समूहाचे सीएफओ जुगशिंदर सिंग यांनी म्हटले आहे.

चौथ्या स्थानावर घसरण

एका दिवसात हजारो कोटी रुपयांची संपत्ती गमावल्याने गौतम अदानी यांचा श्रीमंतांच्या यादीतील नंबरही खाली आला आहे. याआधी तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या अदानींची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यांच्याकडे 120 अब्ज डॉलरची संपत्ती असून या यादीत बर्नार्ड अरनॉल्ट 188 अब्ज डॉलरसह पहिल्या, एलन मस्क 145 अब्ज डॉलरसह दुसऱ्या, तर जेफ बेझोस 121 अब्ज डॉलरसह तिसऱ्या स्थानावर आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.