Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत 12 किलो गांजा जप्त..

सांगलीत 12 किलो गांजा जप्त..


सांगली : सांगली शहरातील शामरावनगर येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांसह गांजा पुरवणारा एकजण अशा तिघांना अटक करण्यात आली. बुधवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. संशयितांकडून गांजा, तीन मोबाईल असा पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

धनंजय शैलेश भोसले (वय 35, रा. शामरावनगर, सांगली), तुषार महेश भिसे (वय 19, रा. काळीवाट, सांगली), गणेश भाऊ साळुंखे (वय 26, रा. कोळे, ता. सांगोला) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अतिरिक्त अधीक्षक आंचल दलाल यांनी नशील्या पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक पथक तयार केले होते. पथकाला जिल्ह्यातून हद्दपार केलेला भोसले याचसह दोघेजण गांजा विक्री करण्यासाठी शामरावनगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने शामरावनगर येथे छापा टाकून भोसले, भिसे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील 12 किलो गांजा जप्त केला.

त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर साळुंखे याने हा गांजा विक्रीसाठी दिल्याचे स्पष्ट झाले. नंतर पथकाने साळुंखे याला कुमठे फाटा परीसरातून अटक केली. निरीक्षक सतीश शिंदे, शहरचे निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार, संदीप पाटील, जितेंद्र जाधव, झाकीर काझी, अभिजित माळकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.