Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तरुणाचे अपहरण करू खून, दोघांना फाशीची शिक्षा !

तरुणाचे अपहरण करू खून, दोघांना फाशीची शिक्षा !


नाशिक :  एक कोटींच्या खंडणीसाठी महाविद्यालयीन २२ वर्षीय तरुण विपीन बाफना याचे अपहरण करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी नाशिक अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने चेतन पगारे त अमन जट या दोघांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली. या पार्श्वभूमीवर न्यायालय आवारात पोलीस बंदोबस्तामुळे छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. तर निकालानंतर आरोपी पगारे याच्या आईने न्यायालयाबाहेर आरडाओरडा करीत गोंधळ घालण्याच्या प्रयत्न केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आदिती कदम यांनी बंद दाराआड या खटल्याचा निकाल दिला.

चेतन पगारे (२५, रा. ओझर टाऊनशिप), अमन जट (२२, रा, केवडीबन, पंचवटी) या दोघांना न्यायालयाने गेल्या मंगळवारी दोषी ठरविले होते. तर, अक्षय उर्फ बाल्या सुळे, संजय पवार आणि पम्मी चौधरी यांची ठोस पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विपीन याचे जुन २०१३ मध्ये आरोपींनी अपहरण केले होते. याप्रकरणी पंचवटी पोलिसात बेपत्ता नोंद दाखल होती. यानंतर आरोपींनी त्याचा खून केला आणि त्याच्या पालकांकडे एक कोटीची खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी अपहरण, खून आणि खंडणीचा मोक्कान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या ९ वर्षापांसून जिल्हा व सत्र न्यायालयात विशेष न्यायालयात याप्रकरणी खटला सुरु होता, या खटल्यात सरकारी पक्षातर्फे विशेष जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी कामकाज पाहिले.

तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त गणेश शिंदे यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले, यात सरकारी पक्षाने ३४ साक्षीदार तपासले. सदरील खटल्याच्या पार्श्वभूमीवर कोर्टाच्या आवारात पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तिघांबाबत अपील विचाराधीन या खटल्यात निर्दोष सुटका करण्यात आलेल्या तिघांबाबत सरकार पक्षातर्फे अपील करण्याची शक्यता आहे, खटल्याच्या निकालाची प्रत आल्यानंतर या बाबत निर्णय घेतलं जाणार आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.