समता पर्वानिमित्त युवा गटाची कार्यशाळा संपन्न
सांगली दि. 1 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत समता पर्वाच्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, सांगली येथे आज जिल्हास्तरावरील युवा गटाची कार्यशाळा संपन्न झाली.
कार्यशाळेत कायदेशीर व फायदेशीर व्यवसाय कसा निवडावा, आर्थिक साक्षरता म्हणजे काय ? बँकेतील कर्ज प्रकरणे, व्यवसाय सुरु करण्यापूर्वीच्या अडचणी व याकरीता करावयाच्या उपाययोजना याबाबत अग्रणी बँकेचे माजी अधिकारी व आर्थिक साक्षरता सल्लागार लक्ष्मीकांत कट्टी, भारतीय युवा ट्रस्ट चे अधिकारी विशाल चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. तर समाज कल्याण विभागाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी युवा गटाची भूमीका निणर्यात्मक असल्याचे समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी सांगितले.
या कार्यशाळेस राम कांबळे, प्राध्यापक श्री. पिंगारे, बार्टीचे प्रकल्प अधिकारी गणेश सव्वाखंडे, समतादुत, तालुका समन्वयक व कर्मचारी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.