Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शिंदे गटाच्या अडचणी वाढणार!

शिंदे गटाच्या अडचणी वाढणार!


एकनाथ शिंदे गटाच्या बीकेसी मैदानातील दसरा मेळाव्यासाठी करण्यात आलेल्या खर्चाविरोधात दाखल झालेल्या याचिकेचे जनहित याचिकेत रुपांतर करा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले. यामुळे शिंदे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या याचिकेवर न्या. अजय गडकरी व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. सामाजिक कार्यकर्ते दिपक जागदेव यांनी ऍड. नितीन सातपुते यांच्या मार्फत ही याचिका केली आहे. मात्र ही रिट याचिका होऊ शकत नाही. या याचिकेचे जनहित याचिकेत रुपांतर करा, असे आदेश खंडपीठाने दिले. त्यामुळे या याचिकेवर दुसऱ्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

या मेळाव्यासाठी शिंदे गटाने एसटीच्या 1700 बसेस बुक केल्या होत्या. याचा नाहक त्रास सर्वसामान्यांना झाला होता. या मेळाव्यासाठी 10 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. एवढे पैसे कोठून आले, याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे..

दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार पाडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. या गटाने दसरा मेळावा घेण्याचा आग्रह धरला. शिंदे गटाने बीकेसी मैदानात दसरा मेळावा आयोजित केला. एखाद्या इव्हेंटप्रमाणे शिंदे गटाने दसरा मेळाव्याची तयारी केली.

कार्यकर्त्यांना कसलीच कमी पडू दिली नाही. कार्यकर्त्यांच्या नाश्त्याचीही सोय करण्यात आली होती. त्या तुलनेत ठाकरे गटाचा दसरा मेळावा दरवर्षीप्रमाणे झाला. त्यासाठी भव्य असा खर्च करण्यात आला नव्हता. त्यामुळे शिंदे गटाने केलेल्या खर्चाची सर्वत्र चर्चा होती.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.