Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली प्रभाग क्रं.१० मध्ये आमदार निधीतून मंजूर रस्त्याचे डांबरीकरण सुरु.... आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी दिले १ कोटी ७० लाख ८५ हजाराचा निधी.....

सांगली प्रभाग क्रं.१० मध्ये आमदार निधीतून मंजूर रस्त्याचे डांबरीकरण सुरु.... आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी दिले १ कोटी ७० लाख ८५ हजाराचा निधी.....



सांगली 8 डिसेंबर 22 :-  सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रं.१० मध्ये आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या आमदार फंडातून प्रभागातील आप्पासाहेब पाटील नगर, इंद्रप्रस्थ नगरी, कलानगर, गोल्डन पार्क, महादेवबाग, टिंबर एरिया या परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी १ कोटी ७० लाख ८५ हजार रुपयांचा निधी देऊन प्रभागातील अनेक रस्त्यांच्या प्रश्न कायमस्वरूपी संपवलेला आहे या प्रभागाचे नगरसेवक जगन्नाथ ठोकळे,नगरसेविका अनारकली कुरणे,भाजपचे ज्येष्ठ नेते मुन्ना कुरणे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व नागरिकांच्या मागणीनुसार प्रभाग १० साठी आमदार सुधीर गाडगीळ यांनी कोट्यावधी रुपयांचा आमदार निधी दिला आहे.

यापूर्वी आप्पासाहेब पाटील नगर येथे ड्रेनेजचे काम झाल्यानंतर तेथील अंतर्गत रस्त्यांची अवस्था फार बिकट झाली होती.वयोवृद्ध नागरिक व परिसरातील सर्वच नागरिकांना याचा फार मोठ्या प्रमाणात त्रास होत होता येथील नागरिकांनी आयुक्त बंगल्यावर आंदोलन देखील केले होते येथील नागरिकांना आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिलेल्या शब्दांनुसार येथील रस्ते चांगल्या पद्धतीने होत असून येथील नागरिकांच्या वतीने मोठ्या उत्साहात या कामाचे उद्घाटन करीत या ठिकाणी सभेचे आयोजन केले होते. या परिसरातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   यावेळी बोलताना आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले की, आप्पासाहेब पाटील नगर येथील प्रथम ड्रेनेजची व्यवस्था करण्यात आली ड्रेनेजचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी रस्ते करून दिले, एखादा भागामध्ये विकास कामे करायच म्हटलं तर तो संपूर्ण भागात विकास कामे पूर्ण करूनच मी बाहेर पडतो. याप्रभागात अनेक प्रश्न आमच्या लोकप्रतिनिधीनी व माझ्या मार्फत मार्गी लागली आहेत. येत्या काळात अनेक  विकास कामे पूर्ण करू अशी ग्वाही यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली.


 

भाजप प्रदेश सदस्य नगरसेवक शेखर इनामदार म्हणाले की, आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत. एखादा शब्द दिला की तो पूर्ण करण्यासाठी अहोरात्र कष्ट करणारी माणसे आहोत. आमदार सुधीर दादा गाडगीळ हे सांगली शहराच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील असतात आपल्या सरकारच्या माध्यमातून शहरातील अनेक प्रश्न आम्ही मार्गे लावत आहोत. लवकरच शहरामध्ये सर्व सोईनीयुक्त नाट्यगृह उभे राहील यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

तसेच मुन्नाभाई कुरणे, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, नगरसेविका अनारकली कुरणे, स्वाती कोल्हापुरे, सुजाता पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


सांगली प्रभाग क्र.10 मधील आप्पासाहेब पाटील नगर येथे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या स्थानिक विकास निधी (आमदार फंड) मधून

1)

अभय पाटील घरटे वर्धमान निवास व सार्थक बंगला ते स्नेह बंगला या मुख्य रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे.

2)

वैष्णवी मंगला ते पारस बंगला व मोतीबाग बंगला मुख्य रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे.

3)

अरिहंत बंगला ते काळी कुंज उमिया बंगला ते आश्रम बंगला आदिनाथ बंगला ते गाडा बंगला बंगला ते ध्यानी स्वामी बंगला रस्ता कडी करण डांबरीकरण करणे.


4)

पारस बंगला ओम बंगला वृंदावन बंगला मातोश्री बंगला उत्तर बाजू बंगला ते पूरक रस्ता या 5 रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे.

5)

हर्ष बंगला योगीराज बंगला अविनाश पाटील घर वर्धमान बंगला या अंतर्गत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे.

6)

गोल्ड पॅलेस गोल्डन साई ओम बंगला या 3 अंतर्गत रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण करणे.

7)

माधवबाग पाटीदार भवन येथील अंतर्गत रस्ते  करणे.

8)

माधव नगर रोड इंद्रप्रस्थ कॉलनी येथील अंतर्गत रस्ते करणे.

9)

इंद्रप्रस्थ नगर मधील गणपती निवास ते भागीरथ शोरूम रस्ता ते प्रदीप इंटरप्राईजेस बंगला रस्ते डांबरीकरण करणे.

10)

बायपास रस्ता ते गोल्डन पार्क मधील मुख्य रस्ता डांबरीकरण व खडीकरण करणे.

11)

कलानगर येथील माधवनगर रोड ते कलानगर रोड हॉटेल दुर्वांकुर रोड ते बायपास रोड ते कलनगर रोड अंतर्गत रस्ते.

12)

टिंबर एरिया येथील हनुमान मंदिर ते सुधीर चौक (भिमनगर)रस्ता डांबरीकरण खडीकरण करणे या कामाचे शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी भागातील नागरिकांच्या हस्ते आमदार सुधीर गाडगीळ यांचा सत्कार करून आभार मानले या कार्यक्रमास भाजपा प्रदेश सदस्य शेखर इनामदार, भाजपा प्रवक्ते मुन्ना कुरणे,गटनेत्या भारती दिगडे, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, नगरसेविका अनारकली कुरणे, गीता पवार,धनेश कातगडे, रामभाऊ चितळे, प्रफुल्ल ठोकळे, शेरखान कुरणे, समशेर कुरणे, सुरज पवार, जमीर कुरणे, योगेश जाधव, प्रियानंद कांबळे, राजू गस्ते, मकरंद महामुलकर, शंकर ऐवळे,गणपती साळुंखे, सतीश ठोकळे,अर्जुन मजले, आशुतोष कळगुटगी,गणपती साळुंखे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर तसेच याभागातील आदी मान्यवर नागरिक उपस्थित होते. उर्वरीत कामे देखील आगामी काळात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत ती कामे देखील कामे करणार असे आश्वासन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.