Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

निवृत्त डीसीपींच्या मुलाला अटक..

निवृत्त डीसीपींच्या मुलाला अटक..


मुंबई :  रिलायन्समध्ये एचआर म्हणून काम करणाऱ्या सोनाली सदाफुले या तरूणीने 14 डिसेंबर रोजी आत्महत्या केली. याप्रकरणी निवृत्त डीसीपीच्या मुलाला साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. तसेच निवृत्त डीसीपी हा त्याची पत्नी आणि मुलीसह फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आतिश कटकधोंड असे अटक केलेल्याचे नाव आहे. रिलायन्समध्ये काम करणारी 28 वर्षीय सोनाली सदाफुले हिने 14 डिसेंबर रोजी आत्महत्या केली आणि सुसाईड नोटमध्ये तिच्या आत्महत्येसाठी निवृत्त डीसीपी बापू कटकधोंड आणि त्यांचा मुलगा आतिश काटधोंड यांच्यासह संपूर्ण कुटुंबाला जबाबदार धरले आहे.

आतिश कटकधोंड आणि सोनाली सदाफुले यांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, 14 डिसेंबर रोजी आतिशचे दुसऱ्या मुलीशी लग्न झाले, जे सोनालीला सहन झाले नाही आणि तिने आत्महत्या केली. आतिश कटकधोंड आतिशचे वडील निवृत्त डीसीपी बापू कटकधोंड, आतिशची आई स्मिता कटकधोंड आणि आतिशची बहीण श्रुती कटकधोंड यांना आत्महत्येसाठी जबाबदार धरण्यात आले आहे. आतिश कटकधोंड याने सोनालीलाही मारहाण केली, हुंड्यासाठी तिचा छळ केला आणि लग्नाच्या बहाण्याने गेल्या अनेक वर्षांपासून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

सोनाली आणि आतिश हे दोघे 2012 मध्ये भेटले, एकमेकांच्या प्रेमात पडले आणि एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. पीडितेच्या आईने तक्रारीत म्हटले आहे की, दोन्ही कुटुंबीयांना या संबंधांची माहिती होती. परंतु आतिशचे कुटुंब त्यांच्या कुटुंबावर 25 लाख रुपयांच्या हुंड्यासाठी सतत दबाव आणत होते. म्हणून सोनाली आणि आतिशचा विवाह झाला नाही. आतिशने सोनालीला लग्नाच्या बहाण्याने खोटे आश्वासन दिले आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. नंतर दुसऱ्याच मुलीशी लग्न केल्याने सोनालीवर मानसिक आघात झाला आणि काळजीत पडली, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तिच्या आईने असाही दावा केला की, आतिशने सोनालीला त्याच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडले. त्यानंतर 2021 मध्ये गोराई पोलीसठाण्यात भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 376 आणि 420 अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.