जत तालुक्यातील विस्तारीत म्हैसाळ योजनेला तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता : खासदार संजयकाका पाटील यांची माहिती
सांगली, : आज मुंबई येथे मंत्रीमंडळ बैठकीत सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपविण्यासाठी म्हैसाळ विस्तारीत योजनेला तांत्रिक सल्लागार समितीने मान्यता दिली, अशी माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.
खासदार संजयकाका पाटील यांनी सांगितले, तांत्रिक सल्लागार समितीने सदर विस्तारित म्हैसाळ योजनेस मान्यता दिली असून आता सदर प्रस्ताव राज्य शासनाच्या अर्थ विभाग आणि मंत्रीमंडळासमोर मान्यतेसाठी सादर केला जाईल. त्यासही प्राथमिकता देवून तात्काळ मंजुरी दिली जाईल. यामुळे योजनेच्या पुर्णत्वाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस हे दोघेही ही योजना लवकरात लवकर पुर्ण करणेसाठी आग्रही आहेत.
सदर मान्यतेमुळे जत तालुक्यातील विस्तारीत म्हैसाळ योजनेचे काम पूर्ण करुन लवकरात लवकर कार्यान्वित केली जाणार आहे. या निर्णयामुळे जत तालुक्यातील जनतेला दिलासा मिळालेला असून नागरिकांमधून याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.