मिरज शहर बचाव कृती समितीच्या अध्यक्षपदी प्रा, प्रमोद इनामदार यांची एकमताने निवड
आज मिरज गेस्ट हाऊस येथे सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांची बैठक संपन्न झाली, त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रस्ता व मिरज शहरातील खराब झालेले रस्ते,, धुळीचे साम्राज्य,, मिशन हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचा पगाराचा प्रश्न ,,,छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची झालेली दुरावस्था,, भाजी मंडईचा प्रश्न ,,,अशा अनेक विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली प्रत्येक नेत्यांनी आपापले विचार मांडले त्यामध्ये झालेले निर्णय खालील प्रमाणे शनिवार दिनांक 10 डिसेंबर 2022 रोजी छत्रपती शिवाजी महाराज रस्ता हाट मिक्स झाला पाहिजे ,या मागणीसाठी गांधी चौक मिरज येते भव्य सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन घेण्याचे ठरले,,
मिशन हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचा पगारा संदर्भात कामगार कमिशनर अनिल गुरवांची भेट घेणे ,,चारिटी कमिशनर ना भेटणे मिशन हॉस्पिटलच्या संचालकांच्या वर फौजदारी गुन्हा दाखल करणे ,,भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिरजेच्या रस्त्या संदर्भात निष्क्रिय आमदार सुरेश भाऊ खाडे यांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करा अशा मागणीचे निवेदन द्यायचे ठरले,, या बैठकीस प्राध्यापक प्रमोद इनामदार यांची मिरज शहर बचाव कृती समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली,,, खालील प्रमाणे संयोजन समिती असेल श्री विज्ञान माने, श्री इंद्रजीत घाटे ,श्री गंगाधर तोडकर ,श्री रुपेंद्र जावळे, श्री हरून खतीब ,बाळासाहेब पाटील ,राजीव गोसावी , भीमराव बेंगलोरे,, गोगा बागवान,, राजेंद्र पाटील ,,महेश चौगुले ,,विनोद चाबुकस्वार ,,शिवाजी त्रिमुखे,, संतोष पाटील ,,हे सर्व प्रमुख उपस्थित होते 10 तारखेच्या आंदोलन यशस्वी करण्याचं निश्चित करण्यात आलं ,,स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक प्रमोद इनामदार यांनी केले,, आभार हरून खतीब यांनी मांडले
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.