Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जेवणाची तक्रार करणाऱ्या तीन पोलिसांना मारहाण

जेवणाची तक्रार करणाऱ्या तीन पोलिसांना मारहाण


नवी मुंबई : रस्सा चांगला नसल्याची तक्रार केल्याने झालेल्या वादातून हॉटेलचालकाने शटर बंद करून तिघा पोलिसांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी कोपरखैरणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरखैरणेतील जगदंब हॉटेलमध्ये ही घटना घडली.

कोपरखैरणे पोलिस ठाण्यातील तीन कर्मचारी गुरुवारी कोपरखैरणेतील जगदंब हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. यावेळी त्यांनी रश्याला चव नसल्याची तक्रार त्यांनी केली. यावेळी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी त्यांना खायचे असेल तर खा नाही तर नका खाऊ नका, असे उलट उत्तर दिले.

हॉटेलचालक, कर्मचारी फरार तिघा पोलिसांनी त्यांना ग्राहकांसोबत अशा प्रकारे उद्धट बोलण्याचा जाब विचारला. यावरून हॉटेल कर्मचारी व पोलिस यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी शटर बंद करून तिघा पोलिसांना डांबून ठेवून मारहाण केली. यामध्ये तिघेही पोलिस जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.