हा राहूल ..........जो गांधी आहे
तीन महिन्यापूर्वी राहूल गांधीं पत्रकार परिषदेतील संवादादरम्यान बोलले कि मी न्याय व संविधान बचावासाठी थेट जनतेत जाणार . कारण गोदी मेडीया विरोधकांना पर्यायाने काॅग्रेस व गांधी परिवाराला बदनाम करण्यात व्यस्त आहे. या *इंडियातील* गोदी भाटांना इतिहासाशी काही देणेघेणे नाही. पण जनतेत जाणार म्हणजे * भारत जोडो* सारखी जोखमीची मोहीम राहूल गांधी काढतील हा धक्काच होता. आमच्या सारख्या सामान्यांना तर होताच पण त्याहून जास्त हा भाजप व गोदी मेडीयाला होता .
ज्या श्रीमती सोनीया गांधी यांनी आपल्या सासूचा गोळ्यांनी चाळण केलेला व पतीचा देहाच्या अक्षरस चिंधड्या उडालेल्या पाहिल्या व हाच मानसिक आघात कोवळ्या वयात प्रियांका व राहूल यांनी सहन केला तोच राहूल अशी धाडसी पदयात्रा काढतोय याचं खरच नवल आहे. आणी या पदयात्रेला मिळणारा जनतेचा अभूतपूर्व असा प्रतिसाद.
ज्या सोनियांना राजीव गांधीच्या पश्चात विदेशी म्हणून हिणवणारे जसे आर एस एस चे अनुयायी होतेच पण काही स्वत:ला पुरोगामी व जाणते राजे म्हणवणारेपण होते हे अनाकालनीय होते. एवढे मोठे मानसिक आघात सहन करूनही सोनिया गांधी ठामपणे भारतातच राहिल्या हे खरे दुखणे या गांधी घरण्याच्या विरोधकांचे होते. सोनियांना दोन्ही लहान मुलांना घेवून परत माहेरी जायला काहीच अडचण न्हवती पण त्या गेल्या नाहीत आणी पंतप्रधानपद नम्रपणाने नाकारून श्री मनमोहनसिंग सारख्या अर्थतज्ञाच्या हातात देश सोपवला. एवढे आघात सहन करून स्व:तच्या मुलाला थेट जनतेत पाठवायचे धाडस जिथे पावला पावलावर धोका आहे हे माहीत असूनसुद्धा जी आई हे धाडस करते यातच सोनियांची महती आहे , याला त्याग म्हणतात.
ज्येष्ठ विचारवंत प्रा. पी बी पाटील यांच्या म्हणण्यानुसार अनिवासी भारतीय कोण व निवासी अभारतीय कोण याचा विचार करावा लागेल. जिथे जीवाला काही धोका नसणारे काही पुढारी अंगरक्षकाचे तांडे घेवून फिरत आहेत तिथे राहूल गांधी निधड्या छातीने पायी फिरत आहे कशासाठी ? याचा विचार सर्वांनीच करावा लागेल. एकीकडे धर्माधिष्ठीत राज्य व्यवस्था प्रस्थापीत होत असताना ज्याचे दूरगामी परिणाम फार गंभीर आहेत तिथे संविधान बचावाचे ऊद्दिष्ठ कितपत साध्य होईल हा चिंतेचा विषय आहे.
काॅंग्रेस अंतर्गत जो G-23 नामक पांढरपेशा हूजरे गट आहे या गटाने जेवढे काॅंग्रेसचे खच्चीकरण केले आहे तेवढे भाजपने सुद्धा केले नाही हे वास्तव नाकारता येणार नाही. जर सर्वच भाजप विरोधकांना संविधान व घटना धोक्यात आहे असे वाटते तर मग सर्व विरोधी पक्ष एका झेंड्याखाली का येत नाहीत. काॅग्रेसनेपण त्या त्या राज्यातील प्रबळ असणार्या प्रादेशिक पक्षांना बिनशर्त पाठिंबा देवून केंद्रातील सत्तेसाठी या पक्षांकडून पाठिंबा घेण्याचा विचार करावा. किंबहुना प्रादेशिक पक्षांनी सुद्धा याचा विचार करून संविधान व घटना बचावाचे ऊद्दिष्ट साध्य होईल.
शिवाजी पाटील , सांगली .
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.