"यापुढं शांत बसणार नाही", सीमावादावर रोहित पवार संतापले
महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड कर्नाटक राज्यात सुरू झाल्याने पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आला आहे. परिस्थिती अधिकच गंभीर झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे-फडणीवस सरकारवर निशाणा साधत कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे.
यानंतर आता राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. कन्नड रक्षण वेदिके'चे कार्यकर्ते महाराष्ट्राचे ट्रक फोडून धुडगूस घालत असताना, हवेत राजकीय गोळीबार करणारे भाजपचे नेते कुठं आहेत? निवडणूक डोळ्यापुढं ठेवून कर्नाटकातील भाजप सरकार आक्रमक होतंय, तर महाराष्ट्रातील भाजपप्रणित सरकार मात्र आपली अस्मिता विसरुन मिळमिळीत भूमिका घेतंय, असं रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे. संवादातून मार्ग काढता येतो, पण वाहनांवर दगड मारणं हा कसला संवाद?राज्य सरकारच्या मिळमिळीत भूमिकेमुळं महाराष्ट्र झुकला, असा अर्थ कर्नाटकाकडून काढला जातोय.
पण राज्यावर आणि राज्याच्या अस्मितेवर असेच हल्ले होत राहिले, तर कधीही कुणापुढं न झुकणारा महाराष्ट्र यापुढं शांत बसणार नसल्याचा इशारा देखील रोहित पवारांनी दिला आहे. सध्याच्या वादामध्ये कर्नाटक सरकार आहे की नाही, याचे ठोस पुरावे आपल्या हातात नाहीत. त्यामुळे आपण कर्नाटक सरकारचे थेट नाव घेऊ शकत नाही, असे विधान मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे. त्यावर तुमचे मत काय?' असा प्रश्न पत्रकाराने विचारला. यावर उत्तर देत त्यांनी शंभूराज देसाई यांना टोला लगावला आहे. "मी छोट्या माणसांबाबत काही बोलत नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.