"जातीयवाद पसरवणारा एकमेव माणूस राज ठाकरे"; इतिहासावरून 'या' नेत्याने राज ठाकरेंना घेरले
मागील दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि त्यांच्या पक्षाने महाराष्ट्रात जातीयवाद पसरवला असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत प्रत्युत्तर दिले. यावेळी शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, राज्यात भोंग्याचे राजकारण कुणी केले. राज ठाकरे यांनी, ते ज्या शरद पवारांवर जातीयवादाची टीका करतात त्यापेक्षा राज ठाकरे यांनीच खरा जातीयवाद पसरवला अशी टीकाही त्यांनी केली.
त्यामुळे झाले काय, राज्यातील काकड आरत्या बंद झाल्या. त्यामुळे ध्रुवीकरणही झाले असल्याचे म्हणत त्यांनी महाराष्ट्रातील जातीयवाद पसरवणारा एकमेव माणूस म्हणजे राज ठाकरे असल्याची टीकाही त्यांनी केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार उदयनराजे यांनी कठोर भूमिका घेत भाजपसह त्यांनी राज्यपालांवर जोरदार निशाणा साधला होता. त्यानंतर त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांची मुंडकी छाटून टाकावी वाटतात असंही त्यांनी वक्तव्य केले होते.
तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला म्हणून रायगडवर आक्रोश मोर्चा काढणार असल्याचंही त्यांनी सांगितले होते. त्यावर मंत्री चंद्रकात पाटील यांनी उदयनराजे यांची छत्रपती उदयनराजे असा उल्लेख करत राज्यपालांनी चुकीचे बोलले असतील तर त्यांनी त्यांना माफ करावं आणि हा विषय मिठवावा अशी त्यांनी मागणी केली होती.
त्यावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, तुम्ही महाराष्ट्राच्या बापाचा अपमान करणार आणि ते महाराष्ट्रानं विसरावं अशी तुम्ही का अपेक्षा करता असं सवालही त्यांनी चंद्रकांत पाटलांना केला आहे. त्यामुळे उदयनराजे यांच्या भूमिकेला पाठिंबा देताना ते म्हणाले की, उदयनराजे यांना संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. त्यामुळे त्यांनी जर आंदोलन केले तर तो त्यांचा अधिकार असल्याचेही त्यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.