Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तुमच्या आधार कार्डचा अनधिकृत वापर होऊ शकतो, 'अशी' घ्या काळजी

तुमच्या आधार कार्डचा अनधिकृत वापर होऊ शकतो, 'अशी' घ्या काळजी


मुंबई : आधार कार्ड हा ओळखीचा महत्वाचा दस्ताऐवज मानला जातो. त्यामुळे आज प्रत्येक ठिकाणी आधार कार्डचा वापर केला जातो. परंतु, प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड वापरत असलात तर त्याची काळजी देखील घेतली पाहिजे. UIDAI म्हणजेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने याबाबत काही सूचना जारी केल्या आहेत. एखाद्या नागरिकाला आपल्या आधार कार्डाचा दस्तऐवज द्यायचा नसेल तर अशा परिस्थितीसाठी UIDAI ने व्हर्जुअल आयडेन्टिटीफायर अशी आभासी पद्धतीने ओळख पटवून देण्याची सेवा उपलब्ध करून दिली आहे.

अशी खबरदारी घ्या

UIDAI ने दिलेल्या निर्देशानुसार, आपल्या ओळखीचा पुरावा म्हणून बँक खाते, पॅन कार्ड तसेच पासपोर्टसह इतर कोणत्याही दस्तावेजांच्या वापराबाबत जी खबरदारी बाळगतो, तशीच खबरदारी आधारच्या वापराबाबतही बाळगा. एखाद्या व्यक्तीच्या ओळखीची ऑनलाइन आणि ऑफलाइन पडताळणी करण्यासाठी आधार कार्ड हा देशभरात वापरला जाणारा एक महत्वाचा दस्ताऐवज आहे. आपल्या आधार कार्ड क्रमांकाचा इलेक्ट्रॉनिक किंवा ऑफलाइन वापर करून आपल्या ओळखीशी संबंधित तपशीलाची पडताळणी आणि खात्री करू शकता. परंतु, आपण आधार कार्डाचा दस्तऐवज एखाद्या संस्थेला देणार असू तर अशावेळी देखील खबरदारी घेतली पाहजे.

ओटीपी कोणासोबतही शेअर करू नका

आवश्यता असून देखील आपल्याला आपले आधार कार्ड द्यायचे नसेल तर त्यासाठी UIDAI ने व्हर्जुअल आयडेन्टिटीफायर अशी आभासी पद्धतीने ओळख पटवून देण्याची सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष आधार क्रमांक देण्याऐवजी अशा तऱ्हेच्या पर्यायी पद्धतीने आपली ओळख पटवून देण्यासाठी संबंधिताला अधिकृत संकेतस्थळाला किंवा माय आधार पोर्टलला भेट द्यावी लागणार आहे. यासोबतच एखाद्यावेळी आधार क्रमांक वापरल्यानंतर मोबाईल फोनवर प्राप्त होणाऱ्या आधार-ओटीपीची माहिती इतर कोणत्याही व्यक्तीला देऊ नये. शिवाय एम-आधारचा पिन नंबर देखील इतरांसोबत शेअर करू नये, असे प्राधिकरणाने म्हटले आहे.

सोशल मीडियावर शेअर करू नका

आधार कार्डची झेरॉक्स किंवा त्याची प्रत कोठेही ठेऊ नये, याबरोबरच आपले आधार कार्ड सोशल मीडियाच्या कोणत्याही प्लेटफॉर्मवर शेअर करून नये, असे आवाहन UIDAI ने नागरिकांना केले आहे.

अनधिकृत वापर होत असेल तर असे ओळखा

आपल्याला आधार कार्डचा अनधिकृत वापर होत असेल तर ते देखील आपल्याला ओळखता येते. त्यासाठी आधार क्रमांक धारक नागरिक 1947 या विनाशुल्क आधार मदत क्रमांकावर यूआयडीएआयशी संपर्क साधू शकतात. यूआयडीएआयची ही मदत नागरिसांसाठी 24 तास सुरू असते. याबरोबरच आधार कार्डचा अनधिकृत वापर होतोय याचा संशय आल्यास आपण help@uidai.gov.in या मेलवर ईमेल करून आपली तक्रार देऊ शकता, असे UIDAI ने म्हटले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.