Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कंम्प्युटर इंजिनिअरने केला इंजिनिअर पत्नीचा खून

कंम्प्युटर इंजिनिअरने केला इंजिनिअर पत्नीचा खून


पुणे : संगणक अभियंता असलेली पत्नी पगाराचे पैसे देत नसल्याने तसेच चारित्र्याच्या संशयावरुन संगणक अभियंता पतीने निर्घुणपणे पत्नीचा खून केला. खून केल्यानंतर पतीने घर मालकाच्या पायावर सात महिण्यांची मुलगी ठेऊन पत्नीचा खून केल्याची माहिती दिली. घरमालकाने तातडीने त्या मुलीच्या माहेरी भाऊ गंगासागरला तसेच पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. ही घटना फुरसुंगी येथे सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

राजेंद्र भाऊराव गायकवाड (वय 30 रा. गंगानगर फुरसुंगी) असे आरोपी पतीचे नाव आहे. तर ज्योती राजेंद्र गायकवाड (वय 28) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी ज्योतीचा भाऊ गंगासागर क्षिरसागर (वय 33 रा.पाषाण) याने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानंतर राजेंद्रला ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रताप शेळके करत आहे.

रविवारीच आली होती मोराहून…

राजेंद्र आणि ज्योती यांचा दि. 20 नोव्हेंबर 2020 मध्ये विवाह झाला होता, त्यांना 27 जून 2022ला मुलगी झाली. बाळंतपणासाठी नांदेडला गेलेल्या पत्नीला नांदवण्यास राजेंद्र तयार नव्हता. माहेरच्यांनी राजेंद्र याची समजूत काढली, त्याने होकार दिला. मात्र, पुन्हा पुण्याला आल्यावर त्याने नकार कळवला. यामुळे रविवारी सकाळी नांदेडवरून ज्योतीला घेऊन तीचा भाऊ गंगासागर आणि आई पुण्यात आली. राजेंद्रने नांदवण्यास नकार दिला, त्यानंतर ज्योतीच्या आई-भावाने पोलीस नियंत्रण कक्षास फोन केला. त्यानंतर घाबरून राजेंद्रने तीला नांदवतो असे सांगितल्याने ते ज्योतीला माहेरी सोडून गेले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.