Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महामंडळ सांगली अधिवेशन इफेक्ट :शाळांना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपलब्ध करण्याचे ना. दिपक केसरकर यांचे विधिमंडळात उत्तर.. --रावसाहेब पाटील

महामंडळ सांगली अधिवेशन इफेक्ट :शाळांना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपलब्ध करण्याचे ना. दिपक केसरकर यांचे विधिमंडळात उत्तर.. --रावसाहेब पाटील


सांगली दि.२३:  महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे राज्यस्तरीय भव्य अधिवेशन सांगलीत खा. सुप्रियाताई सुळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या अधिवेशनात महामंडळाने ठराव संमत करुन पवित्र पोर्टल प्रणाली रद्द करावी व तो पर्यंत शाळांना तातडीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. ना. दिपक केसरकर यांनी दि. ११नोव्हेंबर रोजी मंत्रालयात बैठक घेऊन लवकरच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन महामंडळाच्या शिष्टमंडळास दिले होते. त्याप्रमाणे विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी वित्त विभागाने ८०%जागा भरण्यास मान्यता दिली आहे. 

त्यापैकी ५०% पदे म्हणजे ३० हजार पदे भरण्यात येणार आहेत व डिसेंबर अखेर विद्यार्थी आधार कार्ड जोडणी पूर्ण होताच उर्वरित ३०%पदे भरण्यात येतील तसेच कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करणार नाही अशी माहिती दिली. हा महामंडळाच्या सांगली अधिवेशनाचा इफेक्ट आहे अशी माहिती महामंडळाचे कोषाध्यक्ष रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी दिली आहे. वेतनेतर अनुदान वितरणासाठी रु. ५४ कोटी व आरटीई कायद्यांतर्गत २५ %शुल्क माफी परताव्याच्या थकबाकी पोटी मंजूर रु. २०० कोटीपैकी रु. ८४ कोटीचा निधी उपलब्ध केला आहे. हाही अधिवेशन इफेक्ट असल्याचे पाटील यांनी सांगितले. 

शाळा एकत्रिकरण आणि विद्यार्थ्यांना वहान उपलब्ध करून देणे ही संकल्पना गैरसोयीची असून  व्यवहार्य नसल्याने त्याची अमलबजावणी करु नये. २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा आहे त्याच संख्येवर चालू ठेवणेच उचित ठरेल व महामंडळाच्या अधिवेशनात मागणी केलेल्या पवित्र पोर्टल प्रणाली रद्द करणे यासह सर्व विषयावर लवकर सकारात्मक निर्णय शासनाने घेतला पाहिजे असेही रावसाहेब पाटील म्हणाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.