माजी मंत्री स्वर्गीय मदन भाऊ पाटील यांच्या जयंतीनिमित्त..
सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माजी मंत्री स्वर्गीय मदन भाऊ पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज काँग्रेस भवन सांगली येथे सकाळी 11 वाजता अभिवादनाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी बोलताना मध्यवर्ती बँकेचे माझी अध्यक्ष माननीय महावीर कागवाडे यांनी बोलताना मदन भाऊ यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याची कुवत निर्माण करण्याचे काम केले सर्व सामान्य कार्यकर्त्याला महत्त्वाची पदे देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम मदन भाऊ पाटील यांनी केले यावेळी जिल्हा सरचिटणीस व मार्केट कमिटी माझी सभापती सुभाष सातत्याने बोलताना स्वर्गीय मदन भाऊ पाटील हे कार्यकर्ते तयार करणारा कारखाना होता कार्यकर्त्याची विचारपूस करणारा नेता होता आज अशा नेत्याची गरज या जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आहे.
राहुल जी गांधी यांनी भारत जोडो अभियान चालू करून देशांमध्ये सर्व जाती धर्मातील सर्व कार्यकर्त्यांना एकत्र ित जोडण्याचे काम त्यांनी करीत आहात त्याच पद्धतीने आपल्या जिल्ह्यातील कार्यकर्त्याला जोडण्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांनी जिल्हा जोडो अभियान राबवावी तरच जिल्हा एक संघ होईल काँग्रेसला बळकट करू बळकट होईल असे त्यांनी बोलताना सांगितले यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष यांनीही मदन भाऊ पाटील यांच्या बद्दल त्यांचे अनुभव भाषणामध्ये व्यक्त केले यावेळी स्वागत व प्रास्ताविक सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी केले.
शेवटी आभार ओबीसी सेलचे अशोक सिंग रजपूत यांनी मांडले यावेळी मार्केट कमिटीचे माजी सभापती डॉक्टर सिकंदर जमादार सर सेवा दलाचे पैगंबर , माजी समाज कल्याण सभापती नंदादेवी कोलप मदन भाऊ मंचचे आनंदा लेंगरे व त्यांचे सर्व सहकारी वक्ता सेलचे प्रदेशाध्यक्ष देवानंद जमगी शरद चव्हाण श्रीधर बारटक्के अमित पारेकर विठ्ठलराव काळे सचिन पाटील प्रकाश माने सेवा दलाचे कार्याध्यक्ष अरुण पळसुले सीमा कुलकर्णी प्रतीक्षा काळे शिवाजी सावंत विश्वास यादव नामदेव पठाडे बाब गोंडा पाटील सुरेश पाटील कवलापूर आणि सुरेश गायकवाड मुफीत कोळेकर सुभाष पट्टणशेट्टी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.