Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"स्वतंत्र भारताच्या अमृत महोस्तवानिमित्त आपल्या भारताला अविरत सेवा देणाऱ्या जवानांना मानवंदना"

"स्वतंत्र भारताच्या अमृत महोस्तवानिमित्त आपल्या भारताला अविरत सेवा देणाऱ्या जवानांना मानवंदना"


"स्वतंत्र भारताच्या अमृत महोस्तवानिमित्त आपल्या भारताला अविरत सेवा देणाऱ्या जवानांना मानवंदना" म्हणून सांगलीचा सुपुत्र श्री. राहुल हंकारे व त्याचे सहकारी वैभव रहाटे, राहुल मोकाशी, संदीप कटके, महेंद्र शेवाळे हे सर्वजण १९६८ ते १९८५ या सालातील जावा व येझदी या विंटेज बाइक्स वरून तसेच त्याच्या बॅकअप टीम मध्ये बजरंग संकपाळ व राजू वाकडे हे बॅकअप कार मधून,

१. पुणे, महाराष्ट्र  ते नारायण सरोवर, गुजरात (पाकिस्तान समुद्री सीमेलगत)

२. नारायण सरोवर, गुजरात ते काहो अरुणाचल प्रदेश (चीन सीमेलगत)


३. काहो, अरुणाचल प्रदेश ते पुणे, महाराष्ट्र असा हा ८३३० किलोमीटर्स (१३ नोव्हेंबर २०२२ ते ७ डिसेंबर २०२२ ) चा प्रवास वाकड, पुणे इथून१३ नोव्हेंबर २०२२ चालू केला असून ह्या मोहिमेला भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून मोहिमेची सुवात केली दरम्यान त्यांनी सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या, तसेच मा. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी ह्या मोहिमेची दखल धेऊन ह्या राईड साठी विडिओ संदेशाद्वारे या मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या असून ह्या मोहिमेचे कौतुक केले. दरम्यान हे युवक हा विक्रम कमीत कमी वेळेत आणि सुरक्षेचे व वाहतुकीचे सर्व नियम पाळुन करतील असा विश्वास व्यक्त केला आणि भारतीय जवानांच्या त्यागाची जाणीव व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशातील तरुणांना ह्यातून प्रेरणा मिळेल अशी आशा व्यक्त केली.


सदर राईड व रायडर्स ची इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्डस् आणि अशियन वर्ल्ड रेकॉर्डस् साठी नोंद केली आहे. हया संपूर्ण राईड साठी सुपरजेन ह्या कंपनी चे ऑइल वापरले असून सुपरजेन ह्या कंपनी चे डायरेक्ट युवा उद्योजक कुणाल मराठे यांनी बॅकअप वॅन साठी स्पोनसरशिप दिली होती.

दरम्यान, ह्या बाईक रायडर्स तरुणांनी २०१९ मध्ये कन्याकुमारी ते काश्मीर ते पुणे असा ४२३२ किलोमीटर्सचा प्रवास केला होता या प्रवासात त्यांनी "से नो टू प्लास्टिक" असा संदेश दिला होता या रायडर्स ची इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्डस् आणि अशियन वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये नोंद झाली आहे...


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.