सोनी गावात मुलांचा नामस्मरण सोहळा...
मिरज तालुक्यातील सोनी गावातील क्रांतीवीर दत्ताजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी श्रीगोंदवलेकर महाराज मंदिरात तेरा तास नामस्रमणात दंग होती.
सांगलीः शाळा,महाविद्यालयातील वातावरण म्हटले की, खेळ...अभ्यास...प्रॅक्टीकल... या पलिकडे हे विद्यार्थी भक्तीमार्गाच्या गोडीसाठी जर नामस्मरणात दंग झाले तर...आश्चर्य वाटले ना...? मिरज तालुक्यातील सोनी गावातील क्रांतिवीर दत्ताजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय प्रकाशनगर मधील विद्यालयाच्या परिसरात श्रीगोंदवलेकर महाराज मंदिरात मुल नामस्मरणात दंग होते. श्री राम जयराम जयजयराम... चे नामस्मरण सुरु होते.
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे भक्त पोलीस खात्यातील पोलीस उपाधीक्षक स्व. प्रकाशराव शंकरराव चव्हाण यांनी आपले वडील क्रांतिवीर दत्ताजीराव पाटील उर्फ तात्या यांच्या नावे असलेल्या क्रांतिवीर दत्ताजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय प्रकाशनगर सोनी या विद्यालयाच्या परिसरात श्रीगोंदवलेकर महाराज यांचे मनोहर अप्रतिम असे मंदिर बांधलेले आहे.
या मंदिरात दररोज पुजन नित्यनेमाने नामस्मरण भक्तगण आणि नामसप्ताह विद्यार्थी करत असतात. श्रीब्रह्मचैतन्य प्रतिष्ठान ही संस्था स्थापन करून त्याद्वारे सर्व कार्यक्रम या मंदिरामध्ये घेतले जातात. यावर्षी क्रांतिवीर दत्ताजीराव पाटील (तात्या ) यांच्या 47 व्या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त, क्रांतिवीर दत्ताजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय प्रकाशनगर, सोनी तालुका- मिरज. या विद्यालयामध्ये ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज नामस्मरण सप्ताह आयोजित करण्यात आला होता. यामध्ये नाम जप करण्यासाठी सुरुवातीला विद्यालयातील 110 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. दररोज सकाळी 9.30 ते 10.00 या कालावधीत विद्यार्थ्यांनी नामस्मरण केले . यामध्ये नामस्मरण व्यासपीठ विद्यालयाचे मुख्याध्यापक, श्रीगोंदवलेकर महाराजांचे भक्त प्रशांत चव्हाण यांनी चालविले. दररोज नामस्मरणामध्ये सुरुवातीला श्लोक, नंतर त्या त्या तारखेनुसार गोंदवलेकर महाराजांचे प्रवचन वाचून दाखवणे. नंतर नामस्मरण सेवा आणि त्यानंतर श्रीहनुमान आरती आणि श्रीगोंदवलेकर महाराजांची आरती आणि शेवटी श्लोक म्हणून त्यादिवशीची समाप्ती होत असे . रात्री 9.00 ते 11.00 या वेळेत दररोज सोनी, पाटगाव , धुळगाव , भोसे या परिसरातील प्रत्येक गावातील भजनी मंडळांची भजन सेवा आयोजित करण्यात आली होती.
सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे गट करण्यात आले आणि नामस्मरण घेण्यात आले. यावेळी दंडोबा येथील ब्रह्मचैतन्य श्रीगोंदवलेकर महाराज मंदिराचे प्रदीप सव्वाशे आणि तेथील महिला पुरुष भक्तगण यांनी महाराजांचा काकडा करून अखंड नामस्मरण सेवेचा प्रारंभ करुन दिला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रशांत चव्हाण , मंदिराचे पुजारी संजय गुरव, संगीता सव्वाशे,मनिषा पाटील,जालिंदर पाटील,अरविंद मालेकर,सौ.मालेकर,मुग्धा जोशी आदी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.