Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारतात पुन्हा कोरोनाची लाट? पुढचे 40 दिवस महत्त्वाचे

भारतात पुन्हा कोरोनाची लाट? पुढचे 40 दिवस महत्त्वाचे


जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठया प्रमाणात वाढताना दिसत आहे. भारतातही पुन्हा कोरोनाची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. योग्य प्रकारे काळजी न घेतल्यास भारतात पुढील 40 दिवसात कोरोनाची मोठी लाट येणाचा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. केंद्र सरकारच्या आरोग्यातज्ज्ञांनी कोरोनाच्या लाटेबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, कोरोनाच्या जगभरातील वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुढील 40 दिवस भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. येत्या 40 दिवसांत कोरोनाच्या संभाव्य नव्या (Covid-19) लाटेबाबतच चित्रं स्पष्ट होईल. आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्याच्या शेवटी भारतात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून तयारी सुरु आहे.

जगभरात चीन, जपान, ब्रिटन, ब्राझील, इटली आणि अमेरिकेसह अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा एकदा वेगाने पसरत आहे. मात्र, आतापर्यंत भारतातील परिस्थिती दिलासादायक आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. पण, आता मात्र परदेशातून येणाऱ्या प्रवाशांमुळे भारतातील कोरोना संसर्गाचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. अशा परिस्थितीत योग्य खबरदारी घेणे फार आवश्यक आहे.

खबरदारी घ्या, सुरक्षित राहा

पूर्व आशियानंतर 30 दिवसांनी भारतात लाट येण्याची शक्यता पीटीआयने अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भारतात कोरोनाची नवीन लाट पूर्व आशियामध्ये कोरोनाची लाट आल्यानंतर 30 ते 35 दिवसांनी येते. असे याआधी भारतात आधी आलेल्या कोरोना लाटेनुसार अहवालामध्ये समोर आलं आहे. आत्तापर्यंत हाच ट्रेंड पाहायला मिळाला. आता कोरोनाच्या नव्या लाटेने पूर्व आशियाई देशांमध्ये जोर पकडला आहे. चीनपासून, दक्षिण कोरिया, सिंगापूर, जपान या देशांत नवीन कोरोना रुग्ण वेगाने वाढत आहेत. या आधारावर, जानेवारीच्या अखेरीस भारतात नवीन रुग्णणांमध्ये वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दुबईहून आलेले दोन प्रवासी पॉझिटिव्ह

चेन्नई विमानतळावर दोन प्रवाशांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. चेन्नई विमानतळावर दुबईहून आलेले दोन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. बुधवारी दुबईहून आलेले दोन प्रवासी कोरोनाबाधित असल्याची माहिती आहे. दोन्ही प्रवासी पुदुकोट्टई जिल्ह्यातील अलंगुडी येथील रहिवासी आहेत. तामिळनाडूच्या आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली.भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 188 रुग्ण सापडले आहेत. कोरोना विषाणूच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झाले आहे. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.